शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे खंडपीठाचे आदेश;  शासनाने निधी देण्याचेही निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:53 IST

बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.३०) राज्य शासनास दिले.

ठळक मुद्देरस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे काढणे, वृक्षारोपण, पथदिवे लावणे आणि सौंदर्यीकरण करणे या कामांचाही समावेश

औरंगाबाद : बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.३०) राज्य शासनास दिले. यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाने तीन महिन्यांत द्यावा. निधी मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यांत रस्ता रुंदीकरण आदी अनुषंगिक कामे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.रस्त्यालगतची अतिक्रमणे काढावीत. संबंधित मालमत्तांच्या कायदेशीर मालकांना ‘टीडीआर’ किंवा भरपाई द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. हा रस्ता केंद्र शासनाने स्वत:कडे घ्यावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.बीबी का मकबऱ्यापासून औरंगाबाद लेणीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा पर्यटनावर परिणाम झाला आहे. या रस्त्याचे आणि पथदिव्यांचे काम त्वरित करण्याची विनंती परेश बदनुरे (रा. पहाडसिंगपुरा) यांनी २०१६ मध्ये खंडपीठात जनहित याचिकेद्वारे केली आहे.बीबी का मकबरा येथे देश-विदेशातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असून, येथून औरंगाबाद लेणी अवघ्या अडीच किलोमीटरवर आहे. औरंगाबाद लेणीसुद्धा जगप्रसिद्ध असून, या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत. पर्यटक वरील दोन्ही स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठा उत्सव असतो. मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्ता १९९० च्या शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा पाहिजे; मात्र सध्या या रस्त्याची रुंदी केवळ ६ मीटरच आहे. गेल्या २८ वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, रस्त्यावर पथदिवे लावावेत, महापालिकेने येथील नागरिकांना टीडीआर द्यावा व अनधिकृत बांधकामे थांबवावीत, अशी विनंती याचिकेत केली आहे.याचिकाकर्त्याची बाजू अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी मांडली. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि महापालिकेतर्फे अ‍ॅड. आनंद भंडारी यांनी काम पाहिले.चौकटजागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षबीबी का मकबºयासमोरून औरंगाबाद लेणीकडे जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. बीबी का मकबºयातील डाव्या बाजूच्या मनोºयावर जवळपास सहा फुटांचे झाड उगवल्याचा उल्लेख न्या. नलावडे यांनी सुनावणीच्या वेळी केला. यावरून मकबºयासारख्या जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे शासनाचे किती दुर्लक्ष आहे, ही बाब निदर्शनास येते.

टॅग्स :Courtन्यायालयtourismपर्यटन