औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या बीए, बीएस्सी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आली. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सदर परीक्षा यशस्वीपणे पार पडली. बुधवारी बीए व बीएस्सी प्रथम व द्वितीय सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. उर्वरित अभ्यासक्रमांचे निकाल या आठवड्यात घोषित होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.