शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

जालना शहरात होणार आयुर्वेदिक रुग्णालय

By admin | Updated: June 18, 2017 00:47 IST

जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात ३० खाटांचे सुसज्ज असे आयुर्वेदिक रूग्णालय होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात ३० खाटांचे सुसज्ज असे आयुर्वेदिक रूग्णालय होणार आहे. यामुळे जिल्हावासियांना आता शासकीय रूग्णालयात आयुर्वेदिक उपचार मिळणार आहेत. आयुर्वेदिक उपचारास प्राचीन परंपरा असल्यामुळे हे रूग्णालय महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या जागेत ही रूग्णलाय होणार असून, यासंबंधीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने ईमेलद्वारे आयुर्वेदिक हॉस्पिटलबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात असलेल्या जागेची माहिती संकलित करून तसेच आवश्यक त्या बाबींची माहिती शासनाला कळविण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालयातील आयुष विभागामार्फत आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथिक उपचार केले जातात. मात्र काही वर्षांत आयुर्वेदिक उपचाराकडे वाढलेला कल लक्षात घेता सदर सुसज्ज असे रूग्णालय एक त दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. आयुष विभागाचा एक कक्ष आहे. हे रूग्णालय झाल्यास यात ३० खाटांचा समावेश आहे. कालांतराने खाटांच्या संख्येत वाढ होईल. आयुर्वेदिक रूग्णालयात रूग्णांना आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथीचे दर्जेदार उपचार मिळणार आहेत. सोबत तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील म्हणाल्या, आरोग्य विभागाचा ईमेल नुकताच प्राप्त झाला आहे. रूग्णालय परिसरात असलेल्या एक जागा निश्चित करून तीस खाटांचे रूग्णालय साकारण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. निकषानुसार प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य विभाग जागेची पाहणी करून निर्णय घेणार आहे.