शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:32 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.

ठळक मुद्देमनसेची शिवसेनेवर टीका : शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात ‘सीएम’ चषक, ‘दंडुका’ मोर्चा काढणार

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.मनसेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पैठणगेटहून विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, शेख राज शेख, बालाजी मुंढे, सचिन पाटील, गजानन गिते, बळीराम खटके, बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.जावेद शेख म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, परंतु त्यासंदर्भात काहीही नियोजन केलेले नाही. दुष्काळावरून लक्ष हटविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी दंडुका मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या फक्त इशारा देण्यासाठी दंडुका हातात घेतला जात आहे. त्यानंतरही दुर्लक्ष केले तर दंडुका वापरावा लागेल. मोर्चामध्ये मराठवाड्यातून शेतकºयांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. मुंबईहूनदेखील मनसेचे नेते सहभागी होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आमराव, आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते, संकेत शेटे, किशोर पांडे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.प्रत्येक निवडणुकीत मुद्दाएकीकडे गावांमध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, तर त्याच गावात सीएम चषक खेळले जात आहे, असे सुमित खांबेकर म्हणाले. जावेद शेख म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे, परंतु निवडणुकीनंतर. चार वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा शिवसेनेला आठवला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हाच मुद्दा पुढे केला जातो.-----------

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण