शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात एका जागेसाठी सरासरी १५७ उमेदवार

By admin | Updated: March 22, 2017 18:02 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धर्तीवर राज्यातील पहिल्या पोलीस भरतीला औरंगाबाद ग्रामीण पोलीस

बापू सोळंके/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धर्तीवर राज्यातील पहिल्या पोलीस भरतीला औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या गोकुळ क्रीडा मैदानावर बुधवार सकाळपासून प्रारंभ झाला. एकूण ११४ जागासाठी तब्बल १७ हजार ८०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले असून एका जागेसाठी १५७ उमेदवार आता झुंजणार आहेत. ही भरती पारदर्शक व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर यांच्यासह सुमारे ४० पोलीस अधिकारी मैदानावर ठाण मांडून आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबलच्या ५७ तर जेल विभागाच्या ५७ पदाच्या भरती प्रक्रियेस आज सकाळपासून टी.व्ही. सेंटर येथील ग्रामीण पोलीसांच्या गोकुळ क्रीडा संकुलावर प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, या पोलीस भरतीसाठी १७ हजार ८०० उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रति दिन आम्ही एक हजार उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यास आजपासून सुरवात केली. भरती अत्यंत पारदर्शक व्हावी, यासाठी १० सीसीटिव्ही कॅमेरे आणि १२ कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ शुटींग केली जात आहे. उमेदवारास कोणताही आक्षेप असल्यास सीसीटीव्ही अथवा व्हीडिओ शूटिंग पाहून त्याच्या तक्रारीचे निरसन केले जाऊ शकते. या भरतीसाठी आपण स्वत: मैदानावर उपस्थित राहणार आहोत. शिवाय अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, पाच पोलीस उपअधीक्षकांसह ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी सुमारे २५० पोलीस कर्मचारी तैनातत करण्यात आले आहेत.