शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

जिल्ह्यात खरिपाची सरासरी १०९ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:02 IST

बीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे. बीड जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत १०९. ५४ टक्के पेरणी झाली आहे. बीड आणि गेवराई तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. जिल्ह्यात बाजरी, तूर, उडीद, मुगाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात झाली आहे. बीड जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० इतके आहे. यंदा ७ लाख २१ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, कृषी विभागाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत १०९.५४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बीड तालुक्यात ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. तर ११ हजार ४१५ हेक्टरात सोयाबीन व ११ हजार ६०८ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. तर गेवराई तालुक्यात ६९ हजार ८५६ हेक्टरात कापसाची लागवड झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरीला पसंती दिली आहे. जिल्ह्यात उडीदाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात २३ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. या शिवाय १५ हजार ५२० हेक्टर क्षेत्रात बाजरी, ७३६४ हेक्टर क्षेत्रात तुर तर ७ हजार ७२७ हेक्टरात मुगाची पेरणी केली आहे. आष्टी तालुक्यातील हे आकडे इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. शिरूर कासार तालुक्यात २९ हजार १९२ हेक्टरमध्ये कापसाचा, २३४९ हेक्टरमध्ये सोयाबीन, २८८६ हेक्टरमध्ये तुरीचा तर ९१३१ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्यांनी कापसालाच पसंती दिली असून, ३५ हजार ७४४ हेक्टरमध्ये पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ २० हजार ४९६ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा आहे.गेवराई तालुक्यात कापसानंतर सोयाबीनचे क्षेत्र ६६५४ इतके आहे. धारुर तालुक्यातही २३ हजार ६५० हेक्टर कापसाचा पेरा झाला आहे. त्या पाठोपाठ ७ हजार ४६५ हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे. वडवणी तालुक्यात कापसाचा २२ हजार १०० हेक्टरात पेरा झाला असून, बाजरी, तूर, सोयाबीनचे पिकही शेतकऱ्यांनी घेतले आहे. अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीनशिवाय शेतकऱ्यांनी कापूस, तूर, खरीप ज्वारीला प्राधान्य दिले आहे. केज तालुक्यात ३९ हजार हेक्टरवर कापूस, तर ३५ हजार ७५० हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे.परळी तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र २६ हजार ७७ हेक्टर असून, १९ हजार ४६८ हेक्टरात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे.