शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उपशाविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:28 IST

नांदेड: शहरापासून काही अंतरावरील सोमेश्वर येथे वाळू ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला असून त्याच्याविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याची तक्रार करत समाजवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दोन दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरापासून काही अंतरावरील सोमेश्वर येथे वाळू ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला असून त्याच्याविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याची तक्रार करत समाजवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दोन दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे.सोमेश्वर येथील वाळूघाटावर विनापरवानगी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यासाठी ५०० ब्रासहून अधिक मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार २७ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला तर रेती ठेक्याच्या परिसरात अवैधरित्या ९ हजार ब्रासचा साठा करण्यात आला आहे. या सर्व बाबी प्रशासनाच्या चौकशीत पुढे आल्या आहेत.असे असताना सदर ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कार्यवाही महसूल विभागाने केली नाही. गौण खनिज विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्याचवेळी अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचा आरोप उपोषणार्थी सय्यद मोहसीन यांनी केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ठोठावलेला दंड वसूल करावा, गौण खनिज विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.