शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ जोडणी करणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:47 IST

अवैध नळ जोडणीची बाब समोर येताच शनिवारी (दि. २९) महानगर पालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर या २२ नागरिकांविरुद्ध अवैध नळ जोडणी करून महापालिकेच्या जलवाहिनेचे नुकसान करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंदविले. 

ठळक मुद्देचिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथील नागरिकांनी मुख्य जलवाहिनी फोडून विनापरवाना नळ जोडणी केली. १९ एप्रिल २०१७ पासून हि अनधिकृत नळजोडणी करणे सुरु होते.२२ नागरिकांविरुद्ध अवैध नळ जोडणी करून महापालिकेच्या जलवाहिनेचे नुकसान करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंदविले. 

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ३० : मुख्य जलवाहिनी फोडून विनापरवाना नळ जोडणी करणे चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथील नागरिकांना चांगलेच महागात पडले. अवैध नळ जोडणीची ही बाब समोर येताच शनिवारी (दि. २९) महानगर पालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर या २२ नागरिकांविरुद्ध अवैध नळ जोडणी करून महापालिकेच्या जलवाहिनेचे नुकसान करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंदविले. 

सुनील कोरडे, सुंदरराव खेत्रे, सोमीनाथ दहिहंडे, शब्बीर बागवान, भगीरथ परदेशी, शाम वाघमारे, रंजीत ढाकणे, रामेश्वर ढवळणपुरे, नवपुते वॉशिंग सेंटरचालक, जगन्नाथ रिठ्ठे, साईनाथ धोत्रे, हॉटेल आशादिपचा चालक, संताराम नवपुते, यमाजी रिठ्ठे, शांतीलाल रिठ्ठे, घोरे, वाघ आणि पोपळघट(पूर्ण नावे कळू शकली नाहीत)आणि पोलीस कर्मचारी निवासस्थान क्रमांक ७ आणि ८ मधील रहिवासी अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या नागरीकांची नावे आहेत. 

याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की,  चौधरी कॉलनी परिसरातील नळ कनेक्शनची तपासणी गेल्या काही दिवसापासून मनपाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या तपासणीत तेथील अनेक व्यवसायिक, हॉटेलचालक आणि नागरीकांनी मुख्य जलवाहिनी फोडून अवैध नळ जोडणी केल्याचे समोर आले. १९ एप्रिल २०१७ पासून हि अनधिकृत नळजोडणी करणे सुरु होते.

विशेष म्हणजे या अवैध नळ जोडण्या केलेल्या नागरिकांसोबतच या जोडण्या करून देणा-या प्लंबरलाही यात आरोपी केले जाणार आहे. याप्रकरणी महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता इलियास खाजा यांच्या चोरून नळ जोडण्या करून मुख्य जलवाहिनीचे नुकसान करणे व पाण्याची चोरी केल्याच्या तक्रारीवरून पोलीस नाईक कोलते  गुन्ह्याचा तपास करीत आहेत.