शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटोमेशन सिस्टीम’ ठप्प

By admin | Updated: June 1, 2016 00:16 IST

औरंगाबाद : करदात्यांना विक्रीकराचे रिटर्न भरणे अधिक सोपे जावे यासाठी विक्रीकर विभागाने ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’ घाईघाईत लागू केली.

औरंगाबाद : करदात्यांना विक्रीकराचे रिटर्न भरणे अधिक सोपे जावे यासाठी विक्रीकर विभागाने ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’ घाईघाईत लागू केली. मात्र आता प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात जुनी प्रणाली बंद झाल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच परिस्थिती करदात्यांची झाली आहे. नवीन करदात्यांना मागील दोन महिन्यांपासून व्यवहार करणे कठीण झाले आहे. ही संगणक प्रणाली लागू करणारे देशातील महाराष्ट्र ६ वे राज्य असल्याची बिरुद मिरविणाऱ्या विक्रीकर विभागावर यामुळे नाचक्कीची वेळ आली आहे. विक्रीकर भरताना करदात्यांना अनेक अडचणी येत असत. यात व्हॅट, सीएसटी, जे-१, जे-२ अ‍ॅनेक्झर फॉर्म भरून विभागाच्या साईटवर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करावे लागत होते. मात्र, न्यू आॅटोमेशन सिस्टीममुळे एका युटिलिटीमध्येच सर्व माहिती एका वेळी द्यावी लागणार आहे. तसेच आता खरेदी आणि विक्रीचे प्रत्येक इनव्हॉइस (बिल) द्यावे लागेल. त्यामुळे व्यवहारात व कर भरण्यातही पारदर्शकता येणार आहे. जीएसटी लागू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात होते. राज्यातील करप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या ‘न्यू आॅटोमेशन सिस्टीम’बद्दल करदात्यांना जागरुक करणे आवश्यक होते. पण राज्य शासनाने १ एप्रिलपासून ही संगणक प्रणाली लागू करून टाकली. २१ मे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख होती. मात्र, संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे मुदत १० जून करण्यात आली आहे. २५ मे पासून नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले; पण संगणक प्रणाली कासवगतीने सुरू आहे. ३१ मेपर्यंत अजूनही तांत्रिक अडचणी दूर करण्यात विक्रीकर विभागाला यश आले नाही. १ एप्रिलपासून नवीन संगणक प्रणाली लागू केली. पण नवीन रजिस्ट्रेशनच होत नसल्याने नंबर मिळत नाही. परिणामी, करदात्यांचे व्यवहार सुरू होण्याआधीच ठप्प झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या नवीन संगणक प्रणालीसाठी दोन बड्या कंपन्यांना सुमारे ४०० कोटींचे कंत्राट विक्रीकर विभागाने दिले आहे.