शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे नाव विश्वपटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:45 IST

क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले असून, या शहराच्या ऐतिहासिकतेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत त्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण शनिवारी पार पडले. याप्रसंगी बोलताना राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केले, औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ विश्वपातळीवरील मानचित्र म्हणून आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी चालले आहे. राज्यपालांच्या या गौरवोद्गारामुळे औरंगाबाद शहराला पर्यटनाच्या दृष्टीने आणि ध्वजस्तंभामुळे आणखी महत्त्व येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि इंटरनेट सर्च इंजिनवरदेखील त्याचा गवगवा होण्यास सुरुवात झाली आहे.गुगल सर्च इंजिनवर क्रांतीचौक ध्वजस्तंभ असे सर्च केल्यास त्यासंबंधीची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. ५४ बाय ३६ चा हा स्तंभावरील ध्वज आहे. त्यावर सर्च लाईट लावण्यात आला आहे. हे अष्टकोनी स्मारक आहे. आठ छोटे स्तंभ असून, त्यावर राजचिन्ह आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या संकल्पनेतून हा ध्वजस्तंभ उभा राहिला आहे. मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील करीमनगर या जिल्ह्याचे राज्यपाल रहिवासी आहेत. या प्रांताच्या संवेदना त्यांना माहिती असल्यामुळे प्रेरणादायी ध्वजस्तंभ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी पहिली बैठक झाली होती.