विकास राऊतऔरंगाबाद : वाळूजमधील गट नं. ३८ येथील अमेरिकन कंपनी फायझर हेल्थ केअरचा (हॉस्पिरा) प्रकल्प मंगळवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे उद्योग वर्तुळासह औरंगाबादच्या अर्थकारणाला वार्षिक १२५ कोटींहून अधिक फटका बसणार आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि फायझरवर आधारित असलेल्या छोट्या कंपन्यांना मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. ते उत्पन्न औरंगाबादच्या अर्थकारणात मागील दहा वर्षांपासून असल्यामुळे त्याचा थेट फायदा येथील जीवनमान उंचावण्यासाठी झाला होता.७०० हून अधिक कर्मचारी बेरोजगार तर झालेच, शिवाय ‘डिपेण्ड इकॉनिमक्स’देखील कोलडमडेल, असे उद्योग वर्तुळातून बोलले जात आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये विप्रो कंपनीने गुंतवणुकीसाठी घेतलेला निर्णय रद्द केला. अंदाजे २,२०० कोटी रुपयांच्या आसपास ती गुंतवणूक होती. त्यानंतर पाच महिन्यांतच फायझरसारखी आंतरराष्ट्रीय कंपनी औरंगाबादेतून गाशा गुंडाळून गेली आहे. येत्या काही महिन्यांत वाळूजमधील आणखी एक औषधी कंपनी येथील युनिट बंद करण्याची चर्चा आहे.एकीकडे डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमधील पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात झाली आहे. असे असताना फायझर हेल्थ केअरला टाळे लागणे हे कशाचे द्योतक म्हणावे, असा प्रश्न आहे. कंपनीने येथील उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता उद्योग वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.फार्मा क्षेत्रावर परिणाम नाही, मात्र...फार्मास्युटिकल क्षेत्रावर फायझर बंद होण्याचा परिणाम होणार नाही. मात्र, तेथील कर्मचाºयांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅर्चिड, हॉस्पिरा, फायझर, अशा तीन समूहांनी ती कंपनी आजवर टेकओव्हर केली. त्यामुळे भविष्यात ते युनिट कुणीतरी टेकओव्हर करील. मात्र, सध्या बेरोजगार झालेल्या कर्मचाºयांचे नुकसान झाले आहे. येथील युनिट बंद पडल्यानंतर त्याकडे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय गुंतवणूकदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे मत फार्मा उद्योजक आनंद नागापूरकर यांनी व्यक्त केले.अजून एक फार्मा उद्योग गाशा गुंडळणारवाळूजमधील आणखी एक आंतराष्ट्रीय कंपनी प्रकल्प बंद करण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सदरील कंपनीने मागील पाच महिन्यांपासून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली असून, आगामी काही महिन्यांत ती कंपनीदेखील वाळूजमधून आपले बिºहाड हलविणार असल्याची चर्चा आहे. वाळूजमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे नेटवर्क असून, त्या कंपन्यांनी फायझर बंद झाल्याची दखल घेतल्याचे वृत्त आहे.
औरंगाबादच्या अर्थकारणाला सव्वाशे कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:12 IST
वाळूजमधील गट नं. ३८ येथील अमेरिकन कंपनी फायझर हेल्थ केअरचा (हॉस्पिरा) प्रकल्प मंगळवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे उद्योग वर्तुळासह औरंगाबादच्या अर्थकारणाला वार्षिक १२५ कोटींहून अधिक फटका बसणार आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि फायझरवर आधारित असलेल्या छोट्या कंपन्यांना मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे.
औरंगाबादच्या अर्थकारणाला सव्वाशे कोटींचा फटका
ठळक मुद्देगुंतवणुकीवर होणार थेट परिणाम : फायझर बंद केल्यामुळे नुकसानच