औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २७ जानेवारीपासून सुरूहोणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. रोहा येथे आज सायंकाळी जाहीर झालेल्या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा येथील सुनील दुबिले याचा समावेश करण्यात आला. सुनील दुबिले याने सलग तीन वर्षे वसंतराव नाईक महाविद्यालयास आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे. त्याला प्रशिक्षक युवराज राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.महाराष्ट्राचा संघ : विकास काळे (कर्णधार, पुणे), गिरीश इर्नक (ठाणे), विशाल माने (मुंबई शहर), रिषांक देवडी (मुंबई), नीलेश साळुंके (ठाणे), ए. धुमाळ (रायगड), सुनील दुबिले (औरंगाबाद), सिद्धार्थ देसाई (पुणे), शंकर बनकर (रायगड), अजिंक्य पवार (रत्नागिरी), तुषार पाटील (कोल्हापूर), अभिषेक भोजने (रत्नागिरी). प्रशिक्षक : प्रताप शिंदे (मुंबई उपनगर), व्यवस्थापक : मनोज पाटील (ठाणे). राखीव खेळाडू : आशिष मोहिते (मुंबई उपनगर), पंकज मोहिते (मुंबई शहर), सचिन शेनगडे (सांगली).
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी औरंगाबादच्या दुबिलेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 19:20 IST