शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरविद्यापीठ स्पर्धेत औरंगाबादच्या सपना ढमाले हिला गोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:47 IST

मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिंकली ५ मेडल्स : स्नेहल हारदे, अनिल घुसिंगे यांना रौप्य, पूनम कळेल, प्रमोद काळे यांना कास्य

औरंगाबाद : मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.स्नेहल हारदे हिने उंच उडीत आणि अनिल घुसिंगे याने भालाफेकमध्ये रौप्यपदकांची कमाई केली. पूनम कळेल आणि प्रमोद काळे यांनी अनुक्रमे लांब उडी व गोळाफेकमध्ये कास्यपदकाची कमाई केली.सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत १२.३ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्णपदक जिंकले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंकिता गोसावीने १२.५ सेकंदांसह रौप्य व पुण्याच्याच उज्ज्वला सानपने १३.१ सेकंद वेळ नोंदवत कास्यपदक जिंकले.स्नेहल हारदे हिने उंच उडीत आणि पुरुषांमध्ये अनिल घुसिंगे याने भालाफेकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकून दिले. लांब उडीत पूनम कळेल हिने कास्यपदक जिंकले. कोल्हापूरच्या प्रगती सकपाळने सुवर्ण व पुण्याच्या तृप्ती चितळेने रौप्यपदक पटकावले. पदकविजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरु अशोक तेजनकर, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, कुलसचिव प्रो. साधना पांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.