शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या सीए विद्यार्थी संघटनेचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:00 IST

सीए विद्यार्थी संघटनेच्या देशात १८० शाखा कार्यरत असून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेच्या कार्याचा दिल्लीत गौरव करण्यात आला.

औरंगाबाद : सीए विद्यार्थी संघटनेच्या देशात १८० शाखा कार्यरत असून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेच्या कार्याचा दिल्लीत गौरव करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी येथील शाखेला द्वितीय पुरस्कार प्रदान केला.पश्चिम विभागातील तीन राज्यांतून सर्वोत्कृष्ट शाखेचा बहुमान या एकाच सीए विद्यार्थी संघटनेला मिळाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे होते. भिलाईची सीए विद्यार्थी संघटना पहिल्या क्रमाकांची मानकरी ठरली. त्यांनी ६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सीएच्या अभ्यासक्रमाबद्दल जागृती निर्माण केली. औरंगाबादेतील सीए संघटनेने वर्षभरात जीएसटी, रेरा, ई-वे बिल आदींसंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतले. गुरुपौर्णिमा उत्सव व शहीद जवानांच्या परिवाराला सन्मानित केले व आर्थिक मदत दिली. सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए रोहन आचलिया, उपाध्यक्ष ऐश्वर्या ब्रह्मेचा व सचिव रोहन खंडेलवाल यांनी पुरस्कार स्वीकारला.औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका व पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. शहरातील सर्व सीए विद्यार्थी व सीए यांचा यांचे हे यश आहे, असे प्रतिपादन सीए रोहन आचलिया यांनी केले. संघटनेचे अभिनव शर्मा, मंजिरी महतोले, श्रेया लड्डा, रोहन मुगदिया, राशी तोतला यांनी वर्षभर उपक्रमांसाठी परिश्रम घेतले.