औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा २७ जुलै रोजी शहर व वाळूज परिसरातील विविध शाळांमध्ये तसेच लोकमत भवन येथे होणार आहे. कॅम्पस क्लबचा २०१४-२०१५ वर्षाचा सदस्यच या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. स्पर्धा झोननिहाय विविध शाळांमध्ये उदा. ज्ञानदा स्कूल, रायन इंटनॅशनल स्कूल, तनवाणी इंग्लिश स्कूल, तापडिया इनोव्हशन स्कूल, स्वामी विवेकानंद अकॅडमी, एजीपी पब्लिक स्कूल, आॅर्चिड स्कूल, शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये होईल.स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र व विजेत्याला आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या ड्रॉइंग शीट लोकमत कॅम्पस क्लबकडून दिल्या जातील.तुम्ही कॅम्पस क्लबचे सदस्य नसाल आणि तुम्हाला या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल, तर कॅम्पस क्लबमध्ये सदस्य नोंदणी सुरू आहे. सदस्य नोंदणीसाठी लोकमत भवन येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा.स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ९०११४९८७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कॅम्पस क्लबने केले आहे.
औरंगाबादेतील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा २७ जुलैला
By admin | Updated: July 16, 2014 01:28 IST