शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

औरंगाबादकरांना आवडला ०००७ नंबर, फॅन्सी नंबरसाठी मोजतात तब्बल १.५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST

संताेष हिरेमठ औरंगाबाद : वाहनांच्या नंबरप्लेटवर भाऊ, दादा, नाना अशी नावे लिहिली तर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा ...

संताेष हिरेमठ

औरंगाबाद : वाहनांच्या नंबरप्लेटवर भाऊ, दादा, नाना अशी नावे लिहिली तर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा नंबरप्लेटचे प्रमाण कमी झाले. कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले; पण या कोरोना काळातही फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा कायम आहे. कोणी श्रद्धेपाटी, तर कोणी हौसेपोटी लाखो रुपये पसंतीच्या नंबरसाठी मोजत आहेत. गेल्या सहा महिन्यांत ९९९९, ००७७, ०००७ आणि ०००९ या क्रमांकासाठी सर्वाधिक दीड लाख रुपये मोजण्यात आले. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी नेहमीच प्रचंड चढाओढ असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. कोरोना काळात अनेकांचे अर्थचक्र बदलले. बचतीवर नागरिकांकडून भर दिला जात आहे. परंतु चाॅईस नंबर घेण्याचा कल कुठेही कमी झालेला नाही. वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली. मात्र, पसंती नंबरसाठी खिशाला कात्री बसली तरी चालेल, अशी भूमिका काही वाहनचालकांची पाहायला मिळत आहे.

-----

या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी

-११११- ७० हजार रुपये

-४४४४- ७० हजार रुपये

-७००७ -५० हजार रुपये

------

या नंबरचा रेट सर्वांत जास्त

-९९९९- १ लाख ५० हजार

-००७७ - १ लाख ५० हजार

-०००७- १ लाख ५० हजार

----

आरटीओ कार्यालयाची कामाई

२०१९- २ कोटी ९२ लाख ८९ हजार

२०२०- २ कोटी १३ लाख १ हजार

२०२१ मे - १ कोटी १८ लाख २९ हजार

-----

कोरोना काळातही हौसेला मोल नाही

-हौसेला कुठलेही मोल नसते, असे म्हटले जाते. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉइस, फॅन्सी नंबरच्या बाबतीत हीच स्थिती आहे. नवीन वाहन घेताना विशेष, आवडीचा नंबर घेण्याचा ओढा कोरोना काळातही कायम आहे.

- गतवर्षी, २०२० मध्ये चाॅईस नंबरच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला तब्बल दोन कोटींचा महसूल मिळाला आहे.

- गेल्या पाच महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मे २०२१ यादरम्यान एक कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला.

---

...तर नंबरसाठी होतो लिलाव

१. आरटीओ कार्यालयाकडून नवीन नंबरची मालिका सुरू केल्यानंतर चाॅईस नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात.

२. एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पद्धतीने नंबरचे वाटप केले जाते.

३. यासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा करावा लागतो. ज्याची रक्कम अधिक, त्यास तो नंबर दिला जातो.

----

कोरोनामुळे काहीसा परिणाम

कोरोनामुळे वाहन नोंदणीचे काम काही काळ बंद होते. त्यामुळे चाॅईस नंबर घेण्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आले तर लिलाव पद्धतीने चाॅईस नंबरचे वाटप केले जाते. सध्या आरटीओ कार्यालय आणि डिलर्स यांच्यात बदलाचा कालावधी आहे.

- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी