प्रशांत तेलवाडकर , औरंगाबादउत्तर भारतातील बरेलीचा मांजा, हैदराबादेतील लाकडी चक्री, लखनौचा पतंग देशात ब्रँड बनले आहेत. मात्र, कोणत्याही वातावरणात उत्तम प्रकारे उडू शकतील, असे दर्जेदार पतंग वर्षानुवर्षे शहरात बनविले जात असले तरी येथील पतंगाला असा ब्रँडनेमचा दर्जा मिळू शकला नाही. यासाठी होलसेल पतंग विक्रेत्यांनी पुढाकार घेतला असून विक्रेते व कारागीर यांचे संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे औरंगाबादी पतंगाला देशभरात पोहोचविण्यासाठी आता संघटनेचा एकजुटीचा धागा मिळणार आहे. जे पतंग हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात आकाशात चांगल्या प्रकारे उडू शकतात, ते पतंग देशात कुठेही उडू शकतात हेच औरंगाबादी पतंगांचे वैशिष्ट्य होय. म्हणूनच तर आज या पतंगांनी नाशिक ते निजामाबादपर्यंत गगनभरारी घेतली आहे. शहरात पतंग बनविण्याची खानदानी परंपरा आहे. पिढ्यान्पिढ्या पतंग बनविणारे २२ ते २५ परिवार आहेत. तसेच ८ होलसेलर्स व हंगामी पतंग विकणारे १०० च्या आसपास किरकोळ विक्रेते आहेत. शहरात पतंग बनविणारे परिवार वर्षभर पतंग बनवीत असतात. पतंग बनविणाऱ्या व विकणाऱ्यांच्या अनेक पिढ्या याच व्यवसायावर उदारनिर्वाह करीत आल्या आहेत. हा व्यवसाय असंघटित असल्याने यासाठी बँक कर्जही देत नाही. औरंगाबादी पतंगांचा ब्रँड निर्माण व्हावा, यासाठी नवीन पिढीने आता पाऊल उचलणे सुरू केले आहे. संघटनेचे फायदे अनेक असतात, यासाठी सर्वप्रथम विक्रेते व कारागीर यांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. ही संघटना जिल्हा व्यापारी महासंघांतर्गत कार्य करणार आहे. 1औरंगाबाद शहर हे कमी दाबाच्या पट्ट्यात येते. येथे कधी तरी जोरात हवा असते. येथील वातावरणात चांगल्या प्रकारे उडतील, असे पतंग येथील कारागीर तयार करीत आहेत. पतंग कारागीर दौलतसिंग राजपूत यांनी सांगितले की, पतंगाच्या उभ्या कामटीला ‘तिड्डा’ तर आडव्या कामटीला ‘कमान’ म्हणतात. जाड कामटी असेल तर पतंग उडत नाही. 2पतंग उद्योगाला दर्जा मिळावा, पर्यटनाच्या राजधानीत पतंगबाजीच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व्हाव्यात, येथील पतंगाचा औरंगाबादी ब्रँड तयार करण्यात यावा इ. उद्देशांसाठीही संघटना प्रयत्न करणार आहे. जानेवारी महिन्यात यासंदर्भात सर्व पतंग विक्रेते व कारागिरांची बैठक होणार आहे.संघटना स्थापन करणार औरंगाबादेत संक्रांतीनंतर संघटनेची स्थापना करण्यात येईल. यात कारागीर व होलसेल, किरकोळ विक्रेत्यांना सहभागी करून घेणार आहोत. -मुदस्सीर अहमद, ठोक विक्रेताकागद, मांजा, चक्री, कामटी तयार करणाऱ्या उद्योगांना येथे एकत्र आणून राज्यातील पहिले काईट क्लस्टर बनविता येईल, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. -सय्यद अमिनोद्दीन, पतंग विक्रेता
औरंगाबादी पतंगाला एकजुटीचा धागा बांधणार
By admin | Updated: December 23, 2014 00:21 IST