शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : दंगलीत होरपळलेल्यांना शासकीय मदतीची घोषणा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:48 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. दंगलीच्या ४८ तासांनंतरही राज्य शासनाकडून मदतीची कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात दंगल उसळल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला शासनाकडून मदत जाहीर झालेली आहे. औरंगाबादच्या बाबतीत राज्य शासन वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका का घेत आहे, असा संतप्त सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दंगलीत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत, त्यातील बहुतांश व्यापारी उधारीत माल आणणारे आहेत. अनेकांनी तर विमाही काढलेला नाही. शेकडो वाहने जळाली. त्यातील ९० टक्के वाहनांचा विमा काढलेला नाही. दंगलीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. मोठे व्यापारी हा त्रास सहन करू शकतील. मात्र, छोट्या व्यापाऱ्यांचे काय? त्यांना आर्थिक मदत कोण करणार... ज्या नागरिकांची घरे जाळण्यात आली. ती कुटुंबे उघड्यावर आली. त्यांना शासन सढळ हाताने मदत करणार नाही का...? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दंगलीत दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यात एक १७ वर्षीय तरुण होता. या कुटुंबियांना अद्याप शासनाने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. यापूर्वीच्या अनेक दंगलींमध्ये राज्य शासनानेच मदतीची घोषणा केली आहे. दंगलीच्या ४८ तासांनंतरही शासनाने घोषणा का केली नाही. गृहराज्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामे तयार करून अहवालही पाठवून दिला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसState Governmentराज्य सरकारAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद