शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : औरंगाबाद हिंसाचारप्रकरणात पहिली अटक, एसआयटीची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 15:05 IST

शहरातील मोती कारंजा, शहागंज, राजाबाजार या भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.

औरंगाबाद  : मागील आठवड्यात शहरातील मोती कारंजा, शहागंज, राजाबाजार या भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. मंगळवारी सकाळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची क्रांतीचौक पोलीस स्थानकात एसआयटीने चौकशीकरून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आतापर्यंतची ही पहिली मोठी अटक ठरली आहे.

शुक्रवारी रात्रभर मोती कारंजा शहागंज, राजाबाजार येथे मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला होता. यात शेकडो दुकाने, वाहने  जळून खाक झाली. तसेच दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आता सीसीटीव्हीचे फुटेज तपासात हिंसाचार करणाऱ्याची धरपकड सुरु केली आहे. यासाठीच आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या शिवाजीनगर येथील घरी चौकशीसाठी गेले. याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे शिवसैनिकांसह तेथे जमले. यामुळे या भागात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वातावरण चिघळू नये म्हणून येथे पोलीस बदोबस्त वाढवत दंगल नियंत्रक वाहने पाचारण करण्यात आली. 

यांनतर जिल्हाप्रमुख दानवे यांच्या गाडीतून जंजाळ क्रांतीचौक पोलीस स्थानकात चौकशीसाठी गेले. येथे एसआयटीने त्यांची चौकशीकरून त्यांना ताब्यात घेतले. हिंसाचार प्रकरणात ही पहिली मोठी कारवाई आहे. त्यांना दुपारी ३.३० वाजेदरम्यान कोर्टात नेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटकShiv Senaशिवसेना