शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : रेल्वेमार्ग विद्युतीकरणाची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:50 IST

रेल्वे प्रशासनाकडून ‘दमरे’च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती देण्यात येत आहे. ८०५.६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या मनमाड ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. सेंट्रल आॅर्गनाझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या संकेतस्थळावर ही निविदा प्रसिद्ध झाली असून, मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वे प्रशासनाकडून ‘दमरे’च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती देण्यात येत आहे. ८०५.६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या मनमाड ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. सेंट्रल आॅर्गनाझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या संकेतस्थळावर ही निविदा प्रसिद्ध झाली असून, मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागातील रेल्वेमार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा बसेल, असे ते म्हणाले. यानंतर विद्युतीकरणाच्या कामासाठी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यात रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग (भुयारी मार्ग), वळण, सिग्नल, पॉइंट अ‍ॅण्ड क्रॉसिंग आदींविषयी माहिती गोळा करण्यात आली. सेंट्रल आॅर्गनाझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या अलाहाबाद मुख्य कार्यालयातर्फे मनमाड, अंकई ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रिक्वेस्ट फॉर क्लॉलिफिकेशन (आर.एफ.क्यू) डाक्युमेंट्सची १७ जानेवारीपासून विक्री सुरू आहे.५ मार्चपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी हे प्रस्ताव जमा करण्याची तारीख आहे. याच दिवशी हे प्रस्ताव उघडले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त होणे बाकी असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणाले.