शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेक्रेटरी इलेव्हनच्या विजयात औरंगाबादचा स्वप्नील चमकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:48 IST

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सिनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील चव्हाण, मंगेश निगडे, प्रशांत कोरे आणि अक्षय पालकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने डीव्हीसीए संघाने विजयासाठी दिलेले कठीण असे आव्हानही यशस्वीपणे पेलताना आपली विजयी घोडदौड कायम राखली.

ठळक मुद्देएमसीए सिनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धा : डीव्हीसीए संघावर ५ गडी राखून मात

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सिनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील चव्हाण, मंगेश निगडे, प्रशांत कोरे आणि अक्षय पालकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने डीव्हीसीए संघाने विजयासाठी दिलेले कठीण असे आव्हानही यशस्वीपणे पेलताना आपली विजयी घोडदौड कायम राखली.डीव्हीसीएने विजयासाठी सेक्रेटरी इलेव्हनसमोर ३४१ असे कठीण आव्हान दिले होते; परंतु सेक्रेटरी इलेव्हननेही कठीण आव्हान लीलया पेलताना ४९ षटकांत ५ गडी गमावून ३४१ धावा केल्या. विशेष म्हणजे गुरुवारी पीवायसीकडून नाबाद १३५ धावांची खेळी करणारा मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याने याही लढतीत आपला विशेष ठसा उमटवला. त्याने सेक्रेटरी इलेव्हनकडून सर्वाधिक ८ सणसणीत चौकार आणि एका टोलेजंग षटकारांसह ६० चेंडूंत ७७ धावांची विजयी खेळी केली. त्याच्याशिवाय प्रशांत कोरेने नाबाद ६६, मंगेश निगडेने ६२, अक्षय पालकरने ५७ धावांची खेळी करीत सेक्रेटरी इलेव्हन संघाच्या विजयात योगदान दिले. डीव्हीसीएकडून कार्तिक पलक याने ६८ धावांत २ गडी बाद केले.तत्पूर्वी डीव्हीसीएने ५० षटकांत ६ बाद ३४० धावा ठोकल्या. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १६० धावा फटकावल्या. विनय पाटीलने ८६ व सौरभ नवलेने ३५ धावा केल्या. सेक्रेटरी इलेव्हनकडून इंद्रजित ढिल्लनने ४६ धावांत २ गडीबाद केले. मंगेश निगडे व अक्षय पालकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकडीव्हीसीए : ५० षटकांत ६ बाद ३४०. (ऋतुराज गायकवाड १६०, विनय पाटील ८६, सौरभ नवले ३५. इंद्रजित ढिल्लन २/४६, मंगेश निगडे १/५४, अक्षय पालकर १/५०).सेक्रेटरी इलेव्हन : ४९ षटकांत ५ बाद ३४१. (स्वप्नील चव्हाण ७७, प्रशांत कोरे नाबाद ६६, मंगेश निगडे ६२, अक्षय पालकर ५७, राहुल देसाई २५. कार्तिक पलक २/६८, कपिल गायकवाड १/५०, उत्कर्ष अग्रवाल १/४६).