शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:10 IST

कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

ठळक मुद्देमुलांना मारल्या लाठ्या : विद्यार्थी म्हणाले, पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड; शाळा सुटल्यावर घरी जाताना बेदम मारहाण

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मिटमिट्यातील दगडफेक व लाठीमारीच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही या गावात पोलिसांची भीती कायम आहे. पोलीस अटक करतील या भीतीमुळे अनेक युवक मागील आठ दिवसांपासून गावात आलेच नाहीत. काही कुटुंबे घराला कुलूप लावून परगावी नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावात लहान मुले, तरुणी, बायका,ज्येष्ठ नागरिकच आहेत. अटक केलेली आपली मुले कधी सुटून घरी परत येतील, या आशेने येथील ज्येष्ठ नागरिक दिवस-दिवस प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आठवडाभरानंतर आज विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. मात्र, बुधवारी ६२० पैकी केवळ २२१ विद्यार्थीच शाळेत आले होते. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी शाळेला भेट दिली व मुलांची मने जाणून घेतली. तेव्हा ही मुले आतून कोलमडलेली दिसली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींमध्ये त्यादिवशीच्या घटनेचे भय अजूनही दिसत होते. चौथ्या वर्गातील कृष्णा म्हणाला की, त्याच्या पायावर पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या. रामकिशन मगर म्हणाला की, शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी जात होतो, माझ्या पायावर व हातावर पोलिसांनी लाठी मारली. आम्ही खूप घाबरलो होतो. रितेश क्षत्रियच्या पायावरही लाठी मारली होती. नंदिनी नरवडेच्या डोळ्यादेखत पोलिसांनी तिच्या वडिलांना बेदम मारले. पोलिसांची आम्हाला खूप भीती वाटते. ‘पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड आहेत’, अशा संतप्त प्रतिक्रिया या शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. इयत्ता पाचवीतील ऋतिका म्हणाली की, आम्ही घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलो होतो, तर पवन साबळे या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यादिवशीपासून माझे पप्पा घरी आलेच नाहीत. पोलिसांनी माझ्या भावाला धरून नेले हे सांगताना आजमच्या डोळ्यात अश्रू तरळलेहोते. घरातील टी.व्ही., कपाटाच्या काचा, संडासचा दरवाजा फोडला, आईलाही मारले, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्यासमोर पोलीस आले, तर तुम्ही काय कराल, या प्रश्नावर बहुतांश विद्यार्थी म्हणाले की, ‘आम्ही बेंच खाली लपू.’ एवढी दहशत या बालकांमध्ये अजूनही दिसून येत आहे.