शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

औरंगाबादेत सावरकर पुतळ्याची विटंबना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:04 IST

पोलीस नियंत्रण कक्षापासून शंभर पावलावर असलेल्या समर्थनगरातील वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर संतप्त सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसमर्थनगर येथील घटना : सावरकरप्रेमींचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस नियंत्रण कक्षापासून शंभर पावलावर असलेल्या समर्थनगरातील वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर संतप्त सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. याप्रकरणी मनपाने क्र ांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.पुतळ्यांची विटंबना करण्याचे लोण शनिवारी औरंगाबादेत पोहोचले. समर्थनगरातील चौकात वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर काळी शाई टाकून अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि विटंबना करणाºयाविरोधात घोषणाबाजी करू लागले. या पुतळ्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर शहर पोलिसांचा नियंत्रण कक्ष आहे. संपूर्ण शहरातील प्रत्येक हालचालीवर या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येते.पोलिसांची २४ तास वर्दळ असलेल्या या पुतळ्याची विटंबना करून समाजकंटकांनी पोलिसांना खुले आव्हान दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, आ.अतुल सावे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आ.प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, गोपाल कुलकर्णी, सचिन झवेरी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, किरण सराफ आणि सावरकरप्रेमींनी तेथे धाव घेतली. क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस बंदोबस्तात पुतळा स्वच्छ धुण्यात आला. पुतळ्याचे पूजन करण्यात आले.आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोकोया घटनेनंतर हजारो सावरकरप्रेमींनी पुतळ्याकडे धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केला. आरोपीला अटक झालीच पाहिजे. पुतळ्याची विटंबना करणाºयाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आरोपींना तीन दिवसांत अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदन स्वा. सावरकरप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना देण्यात आले.