शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद :दंगा नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:21 IST

दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी जनसंपर्क वाढवून जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावे, असे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला आणि दगडफेकीला जबाबदार धरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना गुरुवारी शासनाने एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपविला. भारंबे यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला आणि आज दुपारी १२ ते २.३० अशी तब्बल अडीच तास शहरातील पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉॅ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त आणि आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम सेल, महिला तक्रार निवारण मंच आदी विभागाचे निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीनंतर भारंबे म्हणाले की, मिटमिटा येथील घटनेप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व पोेलीस ठाण्यांत कार्यरत पोलिसांना पोलीस म्हणून त्यांचे कर्तव्य काय, दंगलसदृश परिस्थिती प्रशिक्षित पोलिसांनी व्यावसायिक पद्धतीने कशी हाताळावी, याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश सर्व ठाणेप्रमुखांना देण्यात आले.संयमाने बळाचा वापर करावादंगलसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना देण्यात आलेले सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, लाठी, ढाल आदी साहित्य सोबत ठेवावे. आवश्यक तेव्हा बळाचा वापर करून समाजकंटकांना त्यांची जागाही पोलिसांनी दाखवावी. मात्र, हे करीत असताना आपण पोलीस आहोत याचे भान मात्र पोलिसांना असणे आवश्यक आहे. त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळावी, अशा प्रकारचे विशेष मार्गदर्शन त्यांना देण्यात येणार आहे.