औरंगाबाद : नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मागील आठवड्यात महापालिकेला कचरा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना केली होती. मात्र सोमवारपासून प्रशासनाने दिसेल त्या मोकळ््या जागेत खड्डा करून ओला व सुका कचरा पुरण्यास सुरुवात केलीआहे. मनीषा म्हैसकर यांनी शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचºयाचे वर्गीकरण करावे, ओला कचरा वॉर्डांमध्येच खड्डे करून खत तयार करावे, असा सल्ला दिला होता. मात्र उलट सोमवारपासून कमल तलाव, शाळांची मैदानेआदी ठिकाणी कचरा टाकला.>मॉर्निंग वॉक बंद : महापालिका कचरा उचलत नसल्याने ठिकठिकाणी कचºयाला आग लावण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मॉर्निंग वॉकला शुद्ध हवेसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.
औरंगाबादमध्ये दिसली जागा की पूर कचरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 05:41 IST