शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाला पदोन्नती!

By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST

औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद

औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद मनपाला पदोन्नती दिल्याचे परिपत्रक जारी केले आहे. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, दरडोई उत्पन्नाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा वर्ग बदलला जातो. पालिकेची वर्गवारी बदलल्यानंतर होणाऱ्या फायद्या-तोट्यांबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, याबाबत शासनाने अजून काही कळविले नाही. येत्या आठवड्यात सर्व माहिती समोर येईल. मागील दीड महिन्यापासून पालिका ‘क’ वर्गात यावी, यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू होत्या. २०११ साली झालेली जनगणना, २०१५ साली होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रभाग रचनेमुळे पालिकेचा वर्ग बदलण्याबाबत शासनस्तरावर निर्णयासाठी चर्चेच्या फैरी सुरू होत्या. शहराचा विस्तार वाढला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांनी शहर वाढले आहे. त्या तुलनेत लोकसंख्यादेखील वाढली आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार शहरातील ९९ वॉर्डांची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. ‘ड’ वर्गातून मनपा ‘क’ वर्गात आल्यास पालिकेला काही फायदे होणार आहेत. कर्मचारी भरतीची व काही वरिष्ठ संवर्गातील पदांची मान्यता मिळेल. आयुक्त हे पद सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचे होईल. मनपाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हद्दवाढ व मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाऊ शकते. १४०० कोटींची कामे मनपाद्वारे सुरू आहेत. त्याचे मॉनिटरिंग करण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची जादा पदे मिळतात. गेल्या आठवड्यातच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त मनपाला मिळाले आहेत. त्याच दिवशी पालिका ‘क’ वर्गात आल्याचे स्पष्ट झाले होते. 1पालिकेला वित्त आयोगातून निधी मिळणार नाही. ‘ड’ वर्गातील मनपा व नगरपालिकांनाच निधी मिळतो. आता मनपाला स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील. 2प्रशासकीय खर्चात वाढ होऊ शकते. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवावे लागेल. शासकीय अनुदानाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.