शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : पिस्तूल गहाळप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:14 IST

उच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असताना दारूच्या नशेत पिस्तूल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविणारा पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यास पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस खात्यातून बडतर्फ केले. ही कारवाई टाळण्यासाठी स्वामीने मंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांवर दबाव आणला होता, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असताना दारूच्या नशेत पिस्तूल गहाळ झाल्याची तक्रार नोंदविणारा पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यास पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस खात्यातून बडतर्फ केले. ही कारवाई टाळण्यासाठी स्वामीने मंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांवर दबाव आणला होता, हे विशेष.६ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली तेव्हा अमित नशेत तर्रर्र होता. तत्पूर्वी भोईवाड्यातील घरातून सामान घेऊन अमित हनुमाननगरातील नव्याने भाड्याने घेतलेल्या खोलीकडे मित्राच्या रिक्षातून निघाला होता. तत्पूर्वी तिघांनी दारू पीत असताना पिस्तूलसोबत सेल्फीही काढली. रात्री १०.४० वाजेच्या सुमारास हनुमाननगरकडे जात असताना अमित रिक्षातच झोपला. आवाज देऊनही तो उठत नव्हता. त्याच्या मित्रांना हनुमाननगरमधील खोली माहीत नव्हती. त्यामुळे अर्ध्या रस्त्यातून ते परत भोईवाड्याकडे निघाले. आकाशवाणी चौकात त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. त्यानंतर पिस्तूल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे अमितच्या निदर्शनास आले.या घटनेनंतर दुसºया दिवशी पोलीस आयुक्तांनी अमितला निलंबित केले. पिस्तूल आणि दहा राऊंडचा शोध जवाहरनगर आणि गुन्हेशाखा घेत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी अमितला पोलीस खात्यातून बडतर्फ केले. या कारवाईची माहिती पोलीस आयुक्तांनीच दिली.