शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:57 IST

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.बंदी असलेल्या उत्पादनांची निर्मिती थांबवून नव्या उत्पादनांकडे वळावे लागत आहे. नेमक्या कोणत्या उत्पादनावर बंदी आहे, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने कारखाने बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सहन करण्याची वेळ उद्योजकांवर ओढावली आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे.औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत हे उत्पादन करणारे जवळपास ८०, तर औद्योगिक वापरासाठीच्या प्लास्टिकचे ६० पेक्षा जास्त उद्योग आहेत. सर्व प्रकारच्या कॅरिबॅगसह या वस्तू तयार करण्यावरही बंदी आहे. त्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. शिवाय कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याविषयी उद्योजकांमध्ये संभ्रम आहे.कारवाईच्या भीतीने सर्वच उत्पादने बंद ठेवले जात असल्याचे उद्योजकांनी सांगितले. प्लास्टिक बंदीमुळे कामगारांच्या नोकºयांवर परिणाम होत आहे. गेली अनेक वर्षे सुरू असलेले उत्पादन बंद करून नव्या उत्पादनांची निर्मिती करावी लागत आहे. महाराष्ट्रात बंदी असली तरी अन्य राज्यांत बंदी नाही, त्यामुळे इतर राज्यांसाठी उत्पादन घेतो, असेही काहींचे म्हणणे आहे....तरच बंदी यशस्वीकारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी उत्पादन बंद ठेवले आहे. परराज्यांतून येणाºया प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तर खºया अर्थाने प्लास्टिक बंदी यशस्वी होईल. नेमकी कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याबाबत उद्योजकांत संभ्रम आहे. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआपॅकिंग प्लास्टिकवर बंदी नाहीप्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदी आहे. परंतु औद्योगिक उत्पादनांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकवर बंदी नाही. परंतु सगळा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणावरही सरसकट कारवाई होता कामा नये. - मनीष अग्रवाल, उद्योजकआर्थिक फटकातीन महिन्यांपूर्वी बंदी आली तेव्हाच उद्योग सतर्क झाले होते. बंदी असलेली उत्पादनाची निर्मिती थांबविली आहे. इतर उत्पादनांकडे उद्योजक वळले आहेत. परंतु पूर्वी घेतलेली उत्पादने विक्री झालेली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून आर्थिक फटका बसू शकतो.- प्रसाद कोकीळ,अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारHigh Courtउच्च न्यायालय