शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ते पैठण रस्ता ‘भारतमाला’ योजनेतूनच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:49 IST

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘भारतमाला’ परियोजनेतूनच या रस्त्याचे काम होणार असल्याचे एनएचएआयच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘भारतमाला’ परियोजनेतूनच या रस्त्याचे काम होणार असल्याचे एनएचएआयच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुढच्या महिन्यात पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल. त्यानंतर गावे, नकाशे तयार होतील. सध्या तरी शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची जलवाहिनी रुंदीकरणात अडसर ठरते आहे.डीपीआरचे काम करणाºया एजन्सीने अलायमेंटबाबतचा प्राथमिक अहवाल दिला आहे. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता एनएच क्रमांक २११ लगतच असणार आहे. शेंद्रा ते बिडकीन ते वाळूज असा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ४५ कि़मी.पैकी अर्धा रस्ता रिंगरोडदेखील गणला जाईल.डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त प्रस्ताव तयार डीपीआर तयार होत आहे. ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीन मार्ग वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचे देखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल. १९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे.जालना रोड, बीड बायपास या दोन्ही रस्त्यांची कामे होतील, असा दावा एनएचएआयचे मावळते प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी केला. या प्रकल्पाच्या निविदा अद्याप निघाल्या नाहीत. यावर घोटकर म्हणाले, दिल्ली मुख्यालयात याबाबत हालचाली सुरू आहेत. पैठण ते औरंगाबाद डीपीआरचे काम सुरू झाले आहे. सोलापूर ते धुळे या हायवेच्या कामाला गती मिळालेली आहे. जून २०१८ पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण खुला होईल, असा दावा त्यांनी केला.