शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद मनपा वर्धापनदिनी राजकीय कोपरखळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राजकारणात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत कसे काम करता येईल. पोलीस ठाण्यातून ...

ठळक मुद्देनियमबाह्य कामे केल्यानेच तुम्ही नेते झाले...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राजकारणात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत कसे काम करता येईल. पोलीस ठाण्यातून आरोपीला सोडवून आणले तरच नागरिक त्याला नेता म्हणतात. हे काम तुम्ही अनेकदा केले आहे, आता मनपातील नवीन राजकारण्यांना कायद्याच्या चौकटीत काम करण्याचा सल्ला अजिबात देऊ नका, अशी राजकीय कोपरखळी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांना मारली.

निमित्त होते, महापालिकेच्या वर्धापन दिनाचे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सिद्धार्थ उद्यानात सर्व माजी महापौरांचा सत्कार समारंभ गुरुवारी दुपारी आयोजित केला होता. २० पैकी १२ माजी महापौर या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त नवल किशोर राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी महापौर ओबेरॉय यांनी चौफेर फटकेबाजी केली. माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांच्या भाषणाचा धागा पकडत ते म्हणाले की, प्रदीपजी तुम्ही म्हणता सर्वांना कायद्याच्या चौकटीत काम करा... कसे करणार? तुम्ही स्वत: अनेकदा कायद्याच्या विरोधात काम केलेले आहे. त्यामुळेच तर तुम्ही नेते झालात, अशी कोरखळी मारताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

एका घरात दोन महापौर ही किमया फक्त घोडेलेच करू शकतात. दररोज सकाळी घरातून निघताना तोंडात साखर घालून निघायचे, जनसंपर्कही दांडगा आहे. संधी मिळाली तर अजिबात सोडू नका, असा सल्लाही त्यांनी घोडेले यांना दिला. मध्य मतदारसंघात योग जुळवून आणा... संधी पुन्हा पुन्हा येत नाही. माझे बघा संपूर्ण आयुष्य गेले; पण आयुष्यात मी नेहमी म्हणायचो की, ‘अब की बार मैच’ आपले घोडे दामटायचेच असते. यावर एकच हास्याचे फवारे उडाले. या घोषणेवर मी अनेक निवडणुकाही जिंकल्या आहेत. बापू घडामोडे यांच्याकडे बघत पक्षी कसे कोरून काढतात तसे काम यांनी केले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी महापौरांच्या कार्याचा थोडक्यात गौरव केला. विकास जैन आणि गजानन बारवाल यांच्याकडे कटाक्ष करीत हे दोन जण माजी महापौर असूनही सतत सत्तेत असतात. व्यासपीठावर चार माजी महिला महापौर उपस्थित होत्या. सर्व माजी महापौर भगिनी असा शब्दप्रयोग घोडेले यांनी केला. त्यावर सभागृहाच्या भुवया उंचावल्या. दुस-याच क्षणी त्यांनी दुरुस्ती करीत एक माझी सुविद्य पत्नीही आहे, असा उल्लेख केला.

माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांनीही मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्यासमोर पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर हजरजवाबी ओबेरॉय व्यासपीठावरून अजून मी आहे, असे सांगताच एकच हास्याचे फवारे उडाले.घोडेले यांनी खरोखर मध्यमध्ये नशीब अजमावून बघावे. खा. खैरे यांना तुम्ही सांभाळून घ्या... प्रदीपजींना मी सांभाळून घेतो... असेही त्यांनी नमूद केले. माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, बापू घडमोडे, मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी आभार उपमहापौर विजय औताडे यांनी मानले. स्वच्छतेचे काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कारही करण्यात आला.

बापूची ‘ऐनवेळी’ एन्ट्रीकार्यक्रमास उपस्थित ११ माजी महापौरांचा सत्कार झाल्यानंतर ऐनवेळी बापू घडमोडे यांनी कार्यक्रमस्थळी एन्ट्री मारली. उपस्थितांमध्ये बापूंची ऐनवळी एन्ट्री यावर कुजबुज सुरू झाली.

१२ माजी महापौरांचा सत्कारमनपाचे पहिले महापौर शांताराम काळे, प्रदीप जैस्वाल, मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शीलाताई गुंजाळे, सुदाम मामा सोनवणे, विकास जैन, रुक्मिणीबाई शिंदे, अनिता घोडेले, बापू घडमोडे यांची उपस्थिती होती.