शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! औरंगाबाद महापालिकेत मालमत्तेची थकबाकी ५१२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:51 IST

मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान 

ठळक मुद्देव्याजात सूट दिल्याने पहिल्याच दिवशी मनपाच्या तिजोरीत ३८ लाख बड्या थकबाकीदारांना मनपाकडून पत्र

औरंगाबाद : शहरातील विविध मालमत्तांकडे असणाऱ्या थकबाकीचा आकडा पाहून धक्काच बसेल, अशी स्थिती आहे. सुमारे ५१२ कोटींची ही थकबाकी असून ही रक्कम महापालिकेकडून वसूल होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मनपाकडून दरवर्षी मालमत्ता कराची  शंभर टक्के वसुली होत नाही. अनेक मालमत्ताधारकांकडे थकबाकी राहते.  त्यावर दंड, व्याज लावण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा आता चक्क ५१२ कोटींपर्यंत पोहोचला आहे. मालमत्ता करावरील ७५ टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील २१९ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. नागरिकांना ९ लाख ५५ हजार रुपये सूट देऊन ३८ लाख ४४ रुपये वसूल करण्यात आले. 

मनपाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये मिळावेत, असे नियोजन केले आहे. प्रशासनाने थकबाकी आणि चालू वर्षाचा कर या दोन्हींच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात थकबाकीची जास्तीत जास्त रक्कम वसूल होण्याकरिता त्यावरील व्याज आणि दंडाच्या रकमेत ७५ टक्केसूट देण्याची सवलत १५ जानेवारीपर्यंत राहील. मनपाने आता बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. एक लाख रुपयापेक्षा अधिक मोठी रक्कम असलेल्या थकबाकीदारांना मनपाकडून वैयक्तिक पत्र पाठविण्यात येत आहे. मात्र ५१२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीकडे  आतापर्यंत महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवक गांभिर्याने पाहिलेले नाही. 

कर वसुली शिबीर शहरातील नऊ झोनमध्ये कर वसुलीचे शिबीर लावण्यात येणार येत आहे. याशिवाय मालमत्ता कराची काही वादग्रस्त प्रकरणे आहेत. न्यायालयात ही प्रकरणे प्रलंबित आहेत. ती प्रकरणे निकाली निघावीत म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कर अदालत घेण्यात येणार आहे. मनपा मुख्यालयात कायमस्वरूपी शिबीर सुरू केले जाईल. त्यात नागरिकांना आपला थकीत कर भरता येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले, कर निर्धारक व संकलक करणकुमार चव्हाण यांनी सांगितले. 

मनपाच्या रेकॉर्डवरील मालमत्तामालमत्ता    संख्या    थकीत करनिवासी    २,२५,७१४    ३०८ कोटीव्यावसायिक    २३,४४७    १४५ कोटी औद्योगिक    ७५३    ७ कोटी      मिश्र    ५,५१२    ३० कोटीशैक्षणिक    ३३३    १७ कोटीशासकीय    १२९    ५ कोटीएकूण    २,५७,०३१    ५१२ कोटी