शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आणीबाणी’ कायद्याचा वापर करण्यास औरंगाबाद मनपा आयुक्तांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:05 IST

औरंगाबाद शहरात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास मनपा आयुक्तांना ६७-३-क या कायद्यांतर्गत कोणतीही खरेदी किंवा काम करण्याची मुभा आहे. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी आणीबाणी कायद्याचा वापर करून त्वरित प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी कराव्यात, असा आग्रह मंगळवारी आजी-माजी पदाधिका-यांनी मनपा आयुक्तांसमोर धरला. आयुक्तांनी क्षणार्धात नकार देत कोणतीही यंत्रसामुग्री खरेदी करायची असल्यास निविदा पद्धतच वापरावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे तब्बल दोन तासांची चर्चा वांझोटी ठरली.

ठळक मुद्देनिविदा पद्धतीनेच होणार मशीन खरेदी : कचरा कुठे टाकायचा हे तुम्हीच सुचवा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद शहरात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास मनपा आयुक्तांना ६७-३-क या कायद्यांतर्गत कोणतीही खरेदी किंवा काम करण्याची मुभा आहे. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी आणीबाणी कायद्याचा वापर करून त्वरित प्रक्रिया करणाºया मशीन खरेदी कराव्यात, असा आग्रह मंगळवारी आजी-माजी पदाधिका-यांनी मनपा आयुक्तांसमोर धरला. आयुक्तांनी क्षणार्धात नकार देत कोणतीही यंत्रसामुग्री खरेदी करायची असल्यास निविदा पद्धतच वापरावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे तब्बल दोन तासांची चर्चा वांझोटी ठरली.खंडपीठाच्या सूचनेनुसार महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापौर बंगल्यावर मंगळवारी दुपारी १ वाजता शहरातील आमदार, माजी आमदार, खासदार आणि माजी महापौरांची बैठक आयोेजित केली होती. बैठकीस सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आ. किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, अनिता घोडेले, कला ओझा, सुदाम सोनवणे, रशीद मामू, अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी आदींची उपस्थिती होती.पाच कोटींचे काम आणीबाणीत होणार नाहीशहराबाहेर कुठेच कचरा टाकला जाऊ देत नाहीत. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. काल एका कोरियन कंपनीने डेमो दिलाय. कचºयापासून विद्युत निर्मितीचे काम ही कंपनी करते. प्लांट उभारण्यासाठी किमान १२ महिने लागणार आहेत. शहरातील नऊ झोनमध्ये कम्पोस्टिंग करू शकतो; पण जागा नाही. २०० ते ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवावी लागेल. कोणती टेक्नॉलॉजी घ्यायची हे ठरवावे लागेल. महसूलच्या समितीने काही जागा सुचविल्या आहेत. प्रक्रिया करणाºया प्रकल्पाच्या सिव्हिल वर्कसाठी पाच महिने किमान लागतील. सध्या नारेगावात परवानगी द्या, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. आणीबाणी कायद्यांतर्गंत ५ कोटींच्या मशीनची खरेदी कशी करता येईल. ५० लाखांवर स्थायी समितीला अधिकार आहेत. निविदा प्रक्रियेला किमान ४५ दिवस तरी लागतील, असे मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले.