शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : पुतळ्याची विटंबना करणारे मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:55 IST

समर्थनगरातील वि.दा. सावरकर पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्याची घटना उघडकीस येऊन ३६ तास उलटल्यानंतरही पोलिसांना समाजकंटकांना पकडता आले नाही. महानगरपालिकेने मात्र तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा रविवारी बसवून सेफ सिटी प्रकल्पाच्या अन्य कॅमेºयांशी संलग्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समर्थनगरातील वि.दा. सावरकर पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्याची घटना उघडकीस येऊन ३६ तास उलटल्यानंतरही पोलिसांना समाजकंटकांना पकडता आले नाही. महानगरपालिकेने मात्र तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा रविवारी बसवून सेफ सिटी प्रकल्पाच्या अन्य कॅमेºयांशी संलग्न केला.सावरकरांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने शनिवारी पहाटे विटंबना केली होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात समाजकंटकांविरोधात मनपाने गुन्हा नोंदविला. घटना समोर आल्यानंतर हजारो सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून आरोपींना पकडण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरील सेफ सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना त्या कॅमेºयांचा कोणताही लाभ झाला नाही. असे असले तरी परिसरातील विविध दुकानदारांनी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेजची तपासणी पोलीस करीत आहेत.सावरकर चौकात मनपाने बसविला सीसीटीव्ही कॅमेरापुतळे हे महानगरपालिकेची मालमत्ता असल्याने या पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही मनपाची आहे. शनिवारच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या मनपाने आज रविवारी दुपारी सावरकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला. हा कॅमेरा पोलिसांच्या सेफ सिटी कॅमेºयांच्या लाईनसोबत संलग्न करण्यात आला. मात्र, शहरातील अन्य पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी मनपा तेथे कधी कॅमेरे बसविणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.