शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे आणि जलील यांच्यात T20 ची लढत; शेवटच्या फेऱ्यांमध्ये बदलतेय आघाडीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 18:39 IST

सुरुवातीपासून  आघाडीवर असलेले जलील शेवटच्या काही फेऱ्यात पिछाडीवर आले, मात्र त्यांनी पुन्हा आघाडी घेतल्याचे चित्र

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या मतदारसंघातील चौरंगी लढतीत विजय कुणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक फेरीनुसार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्यातील आघाडी कमी जास्त होत आहे. सुरुवातीपासून  आघाडीवर असलेले जलील शेवटच्या काही फेऱ्यात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली.  वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन प्रयोग केला आहे. तो अत्यंत यशस्वी होताना दिसत असून २० फेऱ्यापर्यंत ते आघाडीवर होते. मात्र, २१ व्या फेरीमध्ये सेनेच्या खैरेंनी ७०० मतांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्येही आघाडीवरून चुरस वाढत जात आहे. शेवटच्या माहितीनुसार जलील यांनी परत ९ हजारांची आघाडी घेतली आहे. 

मतदारसंघः औरंगाबादफेरीः २१ वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 370327

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 361060

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 267370

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः 86137

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.    

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.  

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019