शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडवला होता; पण औरंगाबाद जिल्ह्यात ८६ ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडवला होता; पण औरंगाबाद जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, आता ‘म्युकरमायकोसिस’चे नवे रुग्ण आढळून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तर वावगे नाही.

कोरोनाच्या ९० टक्के रुग्णांना या आजाराला तोंड द्यावे लागले. राज्यभरासह जिल्ह्यात मे महिन्यात या आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडले. रुग्णांच्या नातेवाइकांना आणि खाजगी रुग्णालयांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागली. मात्र, ही स्थिती आता नाही. कारण नवे रुग्ण आढळत नसून, जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले. या आजारामुळे डोळे काढावेच लागतात, हा समज घाटीतील डाॅक्टरांनी खोटा ठरविला. तब्बल १५४ वर रुग्णांचे डोळे वाचविण्यात येथील डाॅक्टरांना यश आले. घाटीत सध्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांनी दिली.

----

नवे रुग्ण नाहीत

सध्या ‘म्युकरमायकोसिस’चे नवीन रुग्ण नाहीत. जे पूर्वीचे आहेत, तेच रुग्ण सध्या आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. त्याचा काहीसा फायदा होत आहे.

-डाॅ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

-----

औरंगाबादेतील म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती

एकूण रुग्ण- १,२४८

रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण- १,०७१

एकूण मृत्यू - १५३

उपचार सुरू असलेले रुग्ण- २४