शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:51 IST

कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदारने अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले.

ठळक मुद्देराज्य तलवारबाजी स्पर्धा : दुर्गेश जहागीरदार, कशिष भराड यांची गोल्डन कामगिरी

औरंगाबाद : कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदारने अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले. कशिष भराडनेही गोल्डन कामगिरी करताना आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या गटात २ सुवर्ण, २ रौप्य व चार कास्य, तर मुलींच्या गटात एक सुवर्ण, तीन रौप्य व एका कास्यपदकाची कमाई केली.वैयक्तिक क्रीडा प्रकारातील निकाल (फॉईल) मुले : १. दुर्गेश जहागीरदार, २. तुषार आहेर (दोघेही औरंगाबाद), ३. विपुल येडेकर (कोल्हापूर), ३. जय खंडेलवाल (मुंबई).इप्पी : १. प्रथमकुमार शिंदे (कोल्हापूर), २. प्रणय पिंपळकर (नागपूर), ३. गिरीश जकाते (सांगली), ३. तुषार आहेर (औरंगाबाद). सायबर : १. आदित्य अंगल (कोल्हापूर), २. अभय शिंदे (औरंगाबाद), ३. धनंजय जाधव (कोल्हापूर), निखिल वाघ (औरंगाबाद).फॉईल : १. हर्षदा दमकोंडवार (नागपूर), २. खुशी दुखंडे (मुंबई), ३. ज्योती सुतार (सांगली), ३. यशश्री पवार (सांगली). इप्पी (मुली) : १. वैष्णवी घोडके (अहमदनगर), ३. हर्षदा वडते (औरंगाबाद), ३. स्नेहल पवार (पालघर), ३. अस्मिता दुधारे (नाशिक).सायबर मुली : १. कशिष भराड (औरंगाबाद), २. निशा पुजारी (पालघर), ३. अस्मिता दुधारे (नाशिक), ३. स्नेहल पवार (पालघर).सांघिक (फॉईल- मुले) : १. औरंगाबाद, २. नागपूर, ३. मुंबई, ३. सांगली. इप्पी : १. सांगली, २. कोल्हापूर, ३. नाशिक, ४. औरंगाबाद. सायबर : १. कोल्हापूर, २. औरंगाबाद, ३. मुंबई, ३. लातूर. फॉईल (सांघिक) मुली : १. नागपूर, २. औरंगाबाद, ३. मुंबई, ३. सांगली. इप्पी : १. मुंबई, २. लातूर, ३. नाशिक, ३. औरंगाबाद. सायबर : १. पालघर, २. औरंगाबाद, ३. सांगली. बक्षीस वितरण भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव आहेर, अशोक मगर, वसंतराव देशमुख, संजय देशमुख, अभय देशमुख, अशोक दाबके, प्राचार्य विजय भोसले, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.