शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे उद्योजक ‘आंतरराष्ट्रीय एअर कार्गो’सेवेच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:19 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होण्याची उद्योगांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्दे या सेवे अभावी सध्या औद्योगिक मालाची मुंबईमार्गे परदेशात निर्यात करावी लागते.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होण्याची उद्योगांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या सेवे अभावी सध्या औद्योगिक मालाची मुंबईमार्गे परदेशात निर्यात करावी लागते. त्यामध्ये वेळ आणि पैसा वाया जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाने १२ जून रोजी दिल्लीत नागरी उड्डयन मंत्रालयाचे खाजगी सचिव अंकुर गर्ग, एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड अलायड सर्व्हिसेस कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर बी. के. मेहरोत्रा, नागरी उड्डयन मंत्रालयाचे अवर सचिव दीपक साजवान, आर्थिक सल्लागार वंदना अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी चिकलठाणा विमानतळावरील सेवांसंदर्भात चर्चा झाली. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी, मुनीष शर्मा, आशिष गर्दे यांची यावेळी उपस्थिती होती. 

आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा हाताळण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक होईल. तसेच आवश्यक यंत्रसामग्री चिकलठाणा विमानतळावर कार्यान्वित केली जातील. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक व्यवस्था तयार केली असल्याचे या बैठकीत अंकुर गर्ग यांनी सांगितल्याची माहिती सीएमआयएच्या वतीने देण्यात आली. 

चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळत असून, दररोज या ठिकाणाहून औद्योगिक मालाची वाहतूक होत आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमधील संगणकीय यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात या सेवेची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मंजुरीसार्क  देशांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे कार्यान्वित करण्यासाठी औरंगाबाद विमानतळास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित विमान कंपन्यांकडून औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे संचालित केली जाऊ शकतात. ‘फ्लाई दुबई’ने विमानसेवेसाठी रुची दाखवली आहे. याबरोबरच देशांतर्गंत विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने जुलैमध्ये बैठक होईल, असे गर्ग यांनी स्पष्ट केल्याची माहिती ‘सीएमआयए’तर्फे देण्यात आली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळGovernmentसरकारbusinessव्यवसाय