शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे रायगड संघावर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:48 IST

जबरदस्त सूर गवसलेला उदयोन्मुख प्रतिभावान फलंदाज संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज तनुज सोळुंकेचे ४ बळी या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादने रायगड संघाविरुद्ध आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली आहे.

ठळक मुद्देएमसीए १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : संकेत पाटीलचे सलग दुसरे अर्धशतक, तनुज सोळुंकेचे ४ बळी

औरंगाबाद : जबरदस्त सूर गवसलेला उदयोन्मुख प्रतिभावान फलंदाज संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज तनुज सोळुंकेचे ४ बळी या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादने रायगड संघाविरुद्ध आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली आहे.एडीसीए स्टेडियमवर आज सकाळी औरंगाबादने प्रथम फलंदाजी करताना ६४.४ षटकांत सर्वबाद २१३ धावा फटकावल्या. औरंगाबादकडून संकेत पाटील याने ७३ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकारांसह ५५ आणि यशोवर्धन पवार याने ६६ चेंडूंत ४ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. अंश ठोकळने ६ चौकार व ऋषिकेश कुंदे याने ४ चौकारांसह प्रत्येकी ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी हे औरंगाबादच्या फलंदाजीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. याआधीच्या नांदेडविरुद्ध ६३ धावांची झुंजार खेळी करणाºया संकेत पाटील याने डोळ्यांचे पारणे फेडणारे कव्हरड्राईव्ह आणि पूलचे आकर्षक चौकार मारताना रायगड संघाविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवताना तंत्रशुद्ध फलंदाजी करताना यशोवर्धन पवार याच्या साथीने दुसºया गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करताना औरंगाबादच्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. रायगड संघाकडून मानस लाले याने ३८ व हर्षवर्धन मोहिते यांनी अनुक्रमे ३८ व ३४ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात उतरलेल्या रायगड संघाची तनुज सोळुंके याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीसमोर दिवसअखेर ५ बाद ७० अशी स्थिती झाली आहे. रायगडकडून ओम कुलकर्णी याने ४४ चेंडूंत ३ चौकारांसह सर्वाधिक ३० धावा केल्या. औरंगाबादकडून तनुज सोळुंके याने १६ धावांत ४ गडी बाद केले. सुजल राठोडने ६ धावांत १ गडी बाद करीत त्याला साथ दिली.संक्षिप्त धावफलकऔरंगाबाद (पहिला डाव) : ६४.४ षटकांत सर्वबाद २१३. (संकेत पाटील ५५, यशोवर्धन पवार ४०, अंश ठोकळ ३०, ऋषिकेश कुंदे ३०. मानस लाले २/३८, हर्षवर्धन मोहिते २/३४).रायगड (पहिला डाव) : ५ बाद ७०. (ओम कुलकर्णी ३०, तनुज सोळुंके ४/१६, सुजल राठोड १/६).