लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरातील कचरा समस्येवर मंगळवारी स्वत: ९ झोनमध्ये काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा घेतला. ते स्वत: सेंट्रल नाका येथील डंपिंग ग्राऊंडवर उतरले, त्यांनी सर्व ठिकाणी कच-याच्या ढिगा-यांवर काय प्रक्रिया होत आहे, हे पाहून उपस्थित मनपा अधिका-यांना काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या. मराठवाड्यातून आलेल्या सीईओंबरोबरही त्यांनी चर्चा केली.शहरातील विविध रस्त्यांवर साडेपाच हजार टन कचरा साचलेला होता. तो सर्व कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू असून, ७२ टक्के कचरा पालिकेच्या यंत्रणेने उचलल्याचा दावा त्यांनी केला. १५०० टन कचरा अजून शिल्लक असल्याचेही त्यांनी कळविले. शहरात साचलेला ३९३० टन कचरा उचलण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले, झोन नं. ४ सेंट्रल नाका येथे पाहणी केली. तेथील कचरा संकलन आणि प्रक्रिया याबाबत आढावा घेतला. तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, प्रक्रिया करण्यासाठी खड्डे केले जात आहेत. कचरा प्रक्रिया करण्यासाठी खाजगी जागांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण नागरिकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.भाडेकरारावर जागेसाठी पत्रमनपा आयुक्तांनी जैन स्थानकवासी श्रावक संस्थेच्या अध्यक्षांना कचरा व्यवस्थापनाकरिता गांधेलीतील जागा भाडेकरारावर मागितली आहे. यासाठी आयुक्तांनी संबंधित संस्थेला पत्रही दिले आहे. शहरातील कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनासाठी १५ एकर जागा काही दिवसांसाठी भाडेकरारावर मिळावी, असे आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी उतरले डंपिंग ग्राऊंडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:10 IST
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरातील कचरा समस्येवर मंगळवारी स्वत: ९ झोनमध्ये काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा घेतला. ते स्वत: सेंट्रल नाका येथील डंपिंग ग्राऊंडवर उतरले, त्यांनी सर्व ठिकाणी कच-याच्या ढिगा-यांवर काय प्रक्रिया होत आहे, हे पाहून उपस्थित मनपा अधिका-यांना काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या. मराठवाड्यातून आलेल्या सीईओंबरोबरही त्यांनी चर्चा केली.
औरंगाबाद जिल्हाधिकारी उतरले डंपिंग ग्राऊंडवर
ठळक मुद्दे९ झोनमध्ये फिरून घेतला आढावा : साचलेला साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा