शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

औरंगाबादेत निवृत्त अधिका-याचा बंगला फोडून दहा लाखांचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:10 AM

भारतभ्र्रमणसाठी गेलेल्या निवृत्त वृद्ध दाम्पत्याचा बंगला फोडून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी आणि रोख ७ हजार रुपये, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला.

ठळक मुद्देबेगमपुरा पोलीस ठाणे : पहाडसिंगपु-यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतभ्र्रमणसाठी गेलेल्या निवृत्त वृद्ध दाम्पत्याचा बंगला फोडून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी आणि रोख ७ हजार रुपये, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पहाडसिंगपुरा येथे २१ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, विश्वंभर वाघमारे हे भूमी अभिलेख विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा वाघमारे शासकीय रुग्णालयातून निवृत्त झालेल्या परिचारिका आहेत. वाघमारे दाम्पत्य १० फेब्रुवारीला सहलीवर दक्षिण भारतात गेले होते. गावी जाताना त्यांनी शेजाºयांना घराकडे लक्ष देण्यास सांगितले. संधी साधून बंगल्याच्या दाराचा कडीकोंडा तोडून चोरटे आत घुसले. तळमजल्यामधील खोलीतील लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीच्या वस्तू आणि रोख ७ हजार रुपये पळविले. २१ रोजी सकाळी शेजाºयांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी हैदराबादेत असलेल्या वाघमारे दाम्पत्याला फोन करून दाराचा कडीकोंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य सहल अर्धवट सोडून आज सकाळी औरंगाबादेत परतले. त्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजर्षी आडे यांना कळविली. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, निरीक्षक आडे, उपनिरीक्षक राहुल रोडे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.श्वान पथक, ठसे तज्ज्ञाला पाचारणचोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी काही पुरावे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.सीसीटीव्ही नाही..बंगल्यात एवढे मोठे दागिने आणि रोख रक्कम ठेवून भारतभ्रमणासाठी गेलेल्या वाघमारे दाम्पत्याने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. घराच्या परिसरात सीसीटीव्हीही अथवा सुरक्षारक्षकही त्यांनी नेमला नाही.गुन्हे शाखेच्या अधिकाºयांकडून पाहणीगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. चोरी करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.