शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादने पीडीसीएला १०८ धावांत गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:42 IST

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे सुरू असलेल्या निमंत्रित संघांच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज संदीप सहानी आणि स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने सोमवारी पीडीसीए संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर मधुर पटेल, विश्वजित राजपूत आणि शुभम चाटे या युवा फलंदाजांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर औरंगाबादने निर्णायक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुण्याच्या पीडीसीएची ३ बाद ५८ अशी स्थिती असून, ते अद्यापही १६३ धावांनी पिछाडीवर आहेत.

ठळक मुद्देसंदीप सहानीचे ५ बळी : मधुर, विश्वजित, शुभमची अर्धशतके

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे सुरू असलेल्या निमंत्रित संघांच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज संदीप सहानी आणि स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने सोमवारी पीडीसीए संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर मधुर पटेल, विश्वजित राजपूत आणि शुभम चाटे या युवा फलंदाजांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर औरंगाबादने निर्णायक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुण्याच्या पीडीसीएची ३ बाद ५८ अशी स्थिती असून, ते अद्यापही १६३ धावांनी पिछाडीवर आहेत.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पीडीसीएचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. संदीप सहानी व स्वप्नील चव्हाण यांनी सुरेख फिरकी गोलंदाजी करताना पीडीसीएचा पहिला डाव २२.३ षटकांतच १०८ धावांत गुंडाळला. पीडीसीएकडून अनिकेत कुंभार (२०), मोहंमद ताहीर (१३), प्रशांतसिंग (१२) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. औरंगाबादकडून संदीप सहानी याने ३४ धावांत ५ गडी बाद केले. त्याला स्वप्नील चव्हाणने २४ धावांत ३ व शुभम चाटेने १ गडी बाद करीत सुरेख साथ दिली.गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर चौफेर टोलेबाजी करणाऱ्या मधुर पटेलने जबरदस्त फार्मात असणाºया प्रज्वल घोडके याच्या साथीने १४.३ षटकांतच केलेली ११६ धावांची भागीदारी आणि त्यानंतर विश्वजित राजपूत व शुभम चाटे यांनी सातव्या गड्यासाठी ६३ चेंडूंत केलेल्या ८१ धावांच्या भागीदारीच्या बळावर औरंगाबादने ४७ षटकांतच ३२९ धावा फटकावल्या. अष्टपैलू शुभम चाटे याने सौरव जाधव याच्या साथीने ५७ चेंडूंत ५० धावांची अखेरच्या गड्यासाठी केलेल्या भागीदारीमुळे औरंगाबादची स्थिती आणखी भक्कम झाली. औरंगाबादकडून मधुर पटेल याने ५० चेंडूंतच ८ सणसणीत चौकार व ५ गगनभेदी षटकारांसह ७५ धावांची वादळी खेळी केली. युवा विश्वजित राजपूतने ३८ चेंडूंतच ३ गगनचुंबी षटकार व ८ खणखीत चौकारांसह ६४ आणि शुभम चाटे याने ५६ चेंडूंत ६ चौकार व ३ उत्तुंग षटकारांसह ५५ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. प्रज्वल घोडकेने ४८ चेंडूंत ५ चौकारांह ३८, कर्णधार स्वप्नील चव्हाणने ४ चौकारांसह १९, सौरव जाधवने १३ चेंडूंतच ५ चौकारांसह २१ व सचिन लव्हेराने २ चौकारांसह १२ धावांचे योगदान दिले. पीडीसीएकडून मनोज चौधरीने ११५ धावांत ७ गडी बाद केले. जसविंदरसिंगने ८३ धावांत २ गडी बाद केले. पहिल्या डावात २२१ धावांची भक्कम आघाडी घेणाºया औरंगाबादने पीडीसीएचे ३ फलंदाज ५८ धावांत तंबूत धाडताना आपली पकड आणखी मजबूत केली. पीडीसीएकडून दुसºया डावात प्रसन्ना मोरेने २२ व मोहंमद ताहेरने १७ धावा केल्या. औरंगाबादकडून विकास नगरकरने ९ धावांत २  व प्रवीण क्षीरसागरने ८ धावांत १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकपीडीसीए (पहिला डाव) : २२.३ षटकांत सर्वबाद १०८. (प्रसन्ना मोरे २६, अनिकेत कुंभार २०. संदीप सहानी ५/३४, स्वप्नील चव्हाण ३/२४, शुभम चाटे १/३१). दुसरा डाव : ३ बाद ५८. (प्रसन्ना मोरे २२, मोहंमद ताहेर १७. विकस नगरकर २/०९, प्रवीण क्षीरसागर १/०८).औरंगाबाद (पहिला डाव) : ४७.२ षटकांत सर्वबाद ३२९. (मधुर पटेल ७५, विश्वजित राजपूत ६४, शुभम चाटे ५५, प्रज्वल घोडके ३८, सौरव जाधव २१, स्वप्नील चव्हाण १९, सचिन लव्हेरा १२. मनोज चौधरी ७/११५, जसविंदरसिंग २/८२).