शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडविरुद्ध औरंगाबादचा निर्णायक विजय हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:13 IST

मॅण्डेटरीच्या अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज असतानाही या षटकात फक्त दोन धावा काढता आल्याने औरंगाबादचा संघ एडीसीएवर शनिवारी झालेल्या एमसीएच्या १६ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत नांदेडविरुद्ध निर्णायक विजयापासून थोडक्यात वंचित राहिला.

ठळक मुद्देएमसीए १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : संकेत पाटीलचे अर्धशतक, अकीब मिर्झाचे एकूण ९ बळी

औरंगाबाद : मॅण्डेटरीच्या अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज असतानाही या षटकात फक्त दोन धावा काढता आल्याने औरंगाबादचा संघ एडीसीएवर शनिवारी झालेल्या एमसीएच्या १६ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत नांदेडविरुद्ध निर्णायक विजयापासून थोडक्यात वंचित राहिला.नांदेड संघाने चहापानाआधीच दुसरा डाव ५ बाद १११ या धावसंख्येवर घोषित करताना औरंगाबादला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेत्रदीपक पूल आणि सुरेख ड्राईव्ह मारणाºया सलामीवीर संकेत पाटील आणि सागर पवार यांनी औरंगाबादला जबरदस्त सुरुवात करून देताना १५ षटकांत ८० धावांची सलामी दिली. या सलामीमुळे औरंगाबादच्या निर्णायक विजयाच्या आशा उंचावल्या; परंतु प्रारंभी सागर पवार आणि नंतर निर्णायक क्षणी जम बसलेला संकेत पाटील धावबाद झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.आशुतोष पराये याने झुंजार फलंदाजी केली; परंतु तो औरंगाबादला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि औरंगाबादला ३८ षटकांत ९ बाद १६९ पर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात आघाडी घेणाºया नांदेड संघाला या सामन्यात ३ गुण मिळाले, तर निर्णायक विजयाची संधी हुकवलेल्या औरंगाबादला एका गुणावर समाधान मानावे लागले. औरंगाबादकडून संकेत पाटील याने ७८ चेंडूंत सर्वाधिक ६२ धावा केल्या. सागर पवारने २६, अंश ठोकळने १५ व आशुतोष पराये याने नाबाद १४ धावा केल्या. नांदेडकडून अकीब मिर्झा याने ४९ धावांत ४ गडी बाद केले.तत्पूर्वी, ३ बाद ३२ वरून खेळणारा औरंगाबादचा पहिला डाव नांदेडने १२९ धावांत गुंडाळताना ६१ धावांची आघाडी घेतली. औरंगाबादकडून दुसºया डावात संकेत पाटीलने १७, तनुज साळुंकेने नाबाद १५ व अंश ठोकळने १६ धावा केल्या. नांदेडकडून अकीब मिर्झाने ४० धावांत ५, हर्षमितसिंग कापसे याने २९ धावांत ३ गडीबाद केले.पहिल्या डावात आघाडी घेणाºया नांदेडने त्यांचा दुसरा डाव ५ बाद १११ या धावसंख्येवर घोषित केला. त्यांच्याकडून गौरव अलमखांबे याने ६८ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ व रौनित फुलारी याने १८ धावांचे योगदान दिले. औरंगाबादकडून अंश ठोकळने १५ धावांत ३ गडी बाद केले. तनुज साळुंकेने १ गडी बाद केला.