शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीकरणासाठी औरंगाबाद विमानतळाला प्राधान्य

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

औरंगाबाद : चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील एखादा कार्यक्रम, त्यामध्ये विमानतळावरील एखादा प्रसंग हमखास असतो. अशा प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी सोयीच्या विमानतळांचा शोध घेतला जातो.

औरंगाबाद : चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील एखादा कार्यक्रम, त्यामध्ये विमानतळावरील एखादा प्रसंग हमखास असतो. अशा प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी सोयीच्या विमानतळांचा शोध घेतला जातो. चित्रपटाचे माहेरघर असलेल्या मुंबईपासून औरंगाबाद शहर अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत निर्मात्यांना औरंगाबादचे विमानतळ खुणावत आहे. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही रोल... कॅमेरा...अ‍ॅक्शनचा आवाज घुमत आहे.चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, जाहिरात आदींच्या चित्रीकरणात अनेकदा विमानतळावरील दृश्य महत्त्वपूर्ण ठरते. आजघडीला मुंबईसह अनेक विमानतळांवर चित्रीकरण करण्यासाठी गर्दीसह अनेक अडचणी येतात. त्यामुळे आता नव्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी अनेकांकडून प्राधान्य दिल्या जात आहे. त्यासाठी विमानतळांचा शोध घेतला जातो. अशा वेळी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होत आहे. चिकलठाणा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनीही त्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण केले आहे. चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली परवानगी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे परवानगी मिळविण्यासाठी निर्मात्यांची होणारी अडचण दूर होण्यास मदत होते.विमानतळावरील धावपट्टी आणि विमान उभ्या करण्याच्या परिसरात चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडून परवानगी दिली जाते. चित्रीकरणासाठी तासाचे दरविमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी तासानुसार रक्कम आकारली जाते. त्यामुळे विमानतळाच्या उत्पन्नातही भर पडण्यास मदत होते. शिवाय औरंगाबाद शहराचे नाव चित्रीक रणाच्या माध्यमातून जगभर उमटते, असा विश्वास अधिकाऱ्यांनी केला.अनेकांचा संपर्कचित्रीकरणासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण केले जात आहे. आवश्यक असलेली परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. चित्रीकरणासाठी अनेक जण संपर्क साधत आहेत. यातून विमानतळाला पुरेसे उत्पन्नदेखील मिळते, असे चिकलठाणा विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.आठ निर्मात्यांची पाहणीगेल्या सहा महिन्यांत चित्रीकरणाच्या दृष्टीने आठ निर्मात्यांनी विमानतळाची पाहणी केली आहे. यामध्ये दोघांचे चित्रीकरणही झाले आहे. यामध्ये एका दूरचित्रवाणीवरील लावणीच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा समावेश आहे. त्याचे मार्चमध्ये मोठ्या धूमधडाक्यात चित्रीकरण झाले.