उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिले न दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. संबधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस गाळापासाठी दिला होता. शेतकऱ्यांना ऊसाचे थकीत पैसे कारखाना देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबधित शेतकऱ्यांनी याची उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी संबधित शेतकऱ्यांच्या उसाची बिलाची रक्कम आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते.मात्र १४ एप्रिल पर्यंत जयलक्ष्मी कारखान्याने संबधित शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत बिलाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आदी कार्यक्रम केवळ कारखान्याने ऊसाचे बिल न दिल्यामुळे थांबले आहेत. तसेच याबरोबर घरात असलेले आजारी लोकांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशी तक्रार दाऊतपूर, मातोळा, गोरेवाडी, चिंचोली या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़३७ जणांच्या सह्याकारखान्याने ऊसाचे थकीत बिल दिले नसल्याचे ३७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. यात शिवाजी मोहिते, विजयकुमार बिराजदार, तमनप्पा बिराजदार, महादेव बेडजवळगे, मधुकर लांडगे, तुराब देशमुख, सिध्देश्वर पाटील, दिगबर पाटील, धनराज बिराजदार, किसन लांडगे, निर्मला भोसले, महादेव बिराजदार, गजानन बिराजदार, शिवाजी माळी, गुस्ताथ लांडगे,पार्वतीबाई पाटील, विजयकुमार बिराजदार, गोरबा पाटील, सतीश भोसले, संजय भुजबळ, महादेव साळुंके, मारुती यादव, बाबूराव गाडेकर, अशोक साखरे, प्रभु साखरे, गुंडाप्पा बिराजदार, लक्ष्मण साखरे आदींनी तक्रार केली होती. (प्रतिनिधी)
नितळीच्या जयलक्ष्मी साखर कारखान्याचा लिलाव करा
By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST