शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागरांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: March 21, 2017 23:55 IST

बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राज्याच्या टॉप फाईव्हमधील नेते म्हणून आ. जयदत्त क्षीरसागरांची ओळख आहे

व्यंकटेश वैष्णव बीडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राज्याच्या टॉप फाईव्हमधील नेते म्हणून आ. जयदत्त क्षीरसागरांची ओळख आहे. मात्र, मागील तीन महिन्यांत जिल्ह्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडींवरून क्षीरसागरांची त्यांच्याच पक्षात गोची होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता तर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेमध्ये धस यांच्या खेळीला क्षीरसागरांनी बळ दिले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एकंदरीत या हालचालीनंतर आ. जयदत्त क्षीरसागरांची आगामी राजकीय वाटचाल काय असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून जयदत्त क्षीरसागरांची एक वेगळी ओळख सबंध राज्यात आहे. मात्र, अजित पवार यांच्या धोरणात जयदत्त क्षीरसागर बसत नसल्याचे यापूर्वीही लक्षात आले आहे. बीड पंचायत समितीमध्ये जयदत्त क्षीरसागरांनी काकू-नाना आघाडीला डावलण्यासाठी शिवसंग्रामशी हात मिळवणी केली. संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात बीड पंचायत समितीची सूत्रे गेली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला त्रास सहन करावा लागेल, या उद्देशाने त्यांनी आ. विनायक मेटे यांच्या पक्षाला बीड पंचायत समितीत बळ दिले. यानंतर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या अगदी जवळ जाऊन पोहचली होती. मात्र, माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचेच ५ जि. प. सदस्य फोडले अन् राकाँला सत्ता मिळवण्यापासून रोखले. ही खेळी सुरेश धस यांनी केली मात्र या खेळीमागे जिल्ह्यातील इतरही राकाँचे नेते सहभागी आहेत असा आरोप मंगळवारी राकाँचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला. या खेळीला जेवढे माजी मंत्री सुरेश धस जबाबदार आहेत तेवढेच आ. जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा हे देखील जबाबदार आहेत. यातच डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पक्षाच्या दुटप्पी धोरणामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींवरून राष्ट्रवादीत आ. क्षीरसागरांची कोंडी झाली असल्याचे समोर येत आहे. यानंतर आ. क्षीरसागरांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे उत्कंठावर्धक ठरत आहे.