शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती रिसाला मिरवणुकीने वेधले नागरिकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:01 IST

जालना :रंगार खिडकी येथून काढण्यात आलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

जालना : १२८ वर्षाची परंपरा असलेल्या जालना शहरातील धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने रंगार खिडकी येथून काढण्यात आलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बिपीन पाटील, मनोहर जाधव, ओमप्रकाश भारूका, पत्रकार अंकुशराव देशमुख, विश्वासराव भवर यांची उपस्थिती होती. गेल्या तीन वर्षापासून धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा योग मला प्राप्त झाल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले. अत्यंत शिस्तीने निघणाऱ्या मिरवणुकीचे कौतुकही त्यांनी केले. पोलिस अधीक्षकांच्या हस्ते भारतमाता, राजा, प्रधान व हत्ती यांचे पुष्पहाराने स्वागत करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. ही मिरवणूक काद्राबाद, सराफा, फुलबाजार, नया बाजार, बडी सडक, सुभाष रोड, पाणीवेस मार्गे रंगारखिडकी येथे विसर्जित करण्यात आली. ढोलताशे, वाद्यवृंदाच्या तालावर नाचून तरूणांनी होळीचा आनंद व्यक्त केला. यावर्षीच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ओल्या रंगाचा वापर न करता हत्तीच्या सोंडेतून कोरड्या गुलालाची विविध रंगाच्या फुलांची उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेवड्यांचीही उधळण करण्यात आली. यावेळी सुभाष देवीदान, दिगांबर पेरे, ओमप्रकाश भिसे, हिरालाल पिपरिये, सुरेश गाजरे, विठ्ठल शिर्के, रमेश गौरक्षक, प्रकाश जगताप, रवींद्र राऊत, चंपालाल भगत, राजेंद्र वाघमारे, जीवनभैय्या विजयसेनानी, इंदर गौरक्षक, गोविंद गाजरे, सतीश जाधव, रामराव मगर, मुकुंद पाथरकर, विजयकुमार पंडित, सुर्यकांत पवार, शंकर नवघरे, सुभाष जाधव, रविचंद खर्डेकर, भगवान सिंधनकर, भगवान सोळुंके, रमेश कोठाळे, मुन्ना गजबी, सुभाष कोटुरवार, पांडुरंग काळे, भास्कर निरवे, हरीभाऊ राऊत, अ‍ॅड. प्रविण लाहोटी, कुंडलिक रसाळ, संदीप पवार, अमर ठाकूर, कृष्णा पेरे, दत्ता शिंदे, रावसाहेब पवार, विजय जैन, डॉ. सचदेव, डॉ. सेनानी, रवींद्र बनकर, बाबुराव म्हात्रे काशिनाथ खांडेभराड, कैलास भिसे, प्रमोद सोळुंके, अनिल कोकणे आदींची उपस्थिती होती.