शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष

By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST

मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागातील आरक्षणाचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षात मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारावर थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही थेट जनतेतून निवडले जाणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती, तशी मागणीही काही वर्षांपासून होत होती. नुकताच राज्य शासनाने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यामध्ये ११८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत संपणार आहे. तर ११ ग्रामपंचायतीमधील सदस्य अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे ही संख्या १२९ झाली आहे.जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच हा निर्णय राबविला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनतेशी नाळ कायम असेल तरच सरपंचपद सोपे जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांना एक चांगली संधी यातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील जिंंतूर तालुक्यातील ३४, पाथरी ७, परभणी २९, सेलू १२, गंगाखेड १३, सोनपेठ ३, मानवत ८, पूर्णा १४, पालम तालुक्यातील ९ या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. गंगाखेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य कलम १४ ब खाली अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.