शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:50 IST

घाटी रुग्णालयाच्या परिसरातून लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना नागरिकांनी बेदम चोप देत सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या परिसरातून लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना नागरिकांनी बेदम चोप देत सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़घाटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनवर्षीय मुलगा त्याच्या मामासोबत सोमवारी (दि़ १६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घाटीत आला होता़ घाटीच्या परिसरातील फुटपाथवर मामाने भाच्याला उभे केले होते़ यावेळी काही व्यक्तींनी भाच्यासोबत संवाद साधण्यास सुरुवात केली़ मामाने त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु थोड्याच वेळात आपला भाचा दिसत नसल्याचे मामाच्या लक्षात आले, तसेच भाच्यासोबत बोलणारेही नव्हते. त्यामुळे मामाने आरडाओरड केल्याने नागरिक गोळा झाले. यावेळी एक व्यक्ती पळून जाताना लोकांच्या नजरेस पडली. त्यास लोकांनी पकडून विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यामुळे जमावाने त्याला चोप दिला. त्याने दिलेल्या माहितीवरून दुस-या साथीदाराला पकडण्यात आले़ पोत्यासह त्यांच्याजवळ आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या़ या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़