शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़

लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़ या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेकडून होत आहे़ हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़बाबा आढाव यांनी येथे शनिवारी केला़अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़ व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगले यांची उपस्थिती होती़ प्रारंभी जातीच्या उतरंडीवर बाबा आढाव यांच्या हस्ते फुली मारण्यात आली़ यावेळी ते म्हणाले, जातीअंताचे बिमोड करणारे शिक्षणही दिले जात नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे़ स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकारने घ्यायला हवा, असेही डॉ़बाबा आढाव म्हणाले़ आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे़ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़ शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते़ शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे़ ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़ भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाऱ्या संविधान बदलाचा धोका आहे़ तो वेळीच हाणून पाडला पाहिजे़ त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे असेही ते म्हणाले़ यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़