शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री हिल्स येथील १२ मीटर रस्ता गायब करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST

औरंगाबाद : शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्स येथील अंतर्गत बारा मीटर रुंद रस्ता मूळ जमीन मालकाकडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत ...

औरंगाबाद : शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्स येथील अंतर्गत बारा मीटर रुंद रस्ता मूळ जमीन मालकाकडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोमवारी पत्रकार परिषदेत सह्याद्री हिल्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सुशीलादेवी रमेश बगाडिया यांच्या मालकीच्या जमिनीवर विकासक संजय दाशेटवार यांनी रो हाऊस आणि फ्लॅट तयार करून विकले. मागील काही वर्षांपासून नागरिक येथे राहत आहेत. ९ एकर ९ गुंठ्यांवर हा प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या बाजूला १२ मीटर रुंद रस्ता बांधकाम परवानगी घेताना दर्शविण्यात आला आहे. हा रस्ता विकासकाने महापालिकेला नऊ वर्षांपूर्वी हस्तांतरित सुद्धा केला आहे. महापालिकेने आजपर्यंत रस्त्याचा ताबा घेतला नाही. त्यामुळे मूळ जमीन मालक बगाडिया यांच्या ताब्यात आजही जमीन आहे. महापालिकेला अनेकदा विनंती केल्यानंतरही रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही. महापालिका हा रस्ता विकसित करीत नसेल, तर सोसायटीमधील नागरिक तो विकसित करण्यास तयार आहेत. रस्त्याच्या बाजूला आपल्या खाजगी जमिनीवर बगाडिया मातीचे ढिगारे टाकत असल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी केला. विकासकाने बांधकाम परवानगी नुसार आजपर्यंत महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र सुद्धा घेतलेले नाही. मूळ जमीन मालकांना रस्त्याची जागा म्हणजेच ३ हजार ५०२ चौरस मीटर क्षेत्र परत घ्यायचे आहे, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. या पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सोसायटीचे अध्यक्ष मुरलीधरन नायर, उपाध्यक्ष प्रशांत पारगावकर, मिलिंद परांजपे, अनिलकुमार दाबशेटे, विनोद नानोटकर, हेमंत खेडकर आदींची उपस्थिती होती.

महापालिकेने आज रस्ता विकसित करावा

माझ्या जागेतील बारा मीटर रुंद रस्ता महापालिकेला हस्तांतरित केला आहे ही वस्तुस्थिती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माझी खाजगी जमीन आहे. महापालिका रस्ता विकसित करीत नसल्याने माझ्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण होत आहे. महापालिकेने आजही रस्त्याची जागा मोजून घ्यावी आणि विकास करावा. आम्ही लावलेली तार फेंसिंग कोणत्याही क्षणी काढण्यासाठी तयार आहोत. विकासकाने माझी कोणतीही परवानगी न घेता घरे विकली आहेत. हा वाद वेगळ्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे, असे रमेश बगाडिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.